मिस्टर अँड मिस पुणे एलिट’ दुस-या पर्वाच्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, December 10, 2020

मिस्टर अँड मिस पुणे एलिट’ दुस-या पर्वाच्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन

मिस्टर अँड मिस पुणे एलिट’ दुस-या पर्वाच्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन

तरोनिश मेहता-पुणे‘मिस्टर अँड मिस पुणे एलिट’ दुस-या पर्वाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एका वेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १०० हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला असून त्यापैकी २०तरुण आणि २०तरुणी यामध्ये अंतिम फेरीत पोहचल्या आहेत. खेड शिवापूर येथील नक्षत्र हॉल येथे रविवार दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार आहे. 


स्टार्सट्रीम एन्टाईनमेंटचे डायरेक्टर सोहेल सय्यद म्हणाले की, तरुण आणि तरुणींना सक्षम बनविणे आणि सकारात्मक स्व-प्रतिमा विकसित करण्याची संधी देणे हे आमच्या कंपनीचे लक्ष आहे. आम्ही तरुण पिढीला त्यांची कौशल्ये आणि वकृत्व क्षमता जोपासण्याची संधी उपलब्ध करुन देत आहोत. या स्पर्धेद्वारे आयुष्यभर आठवणी निर्माण करणार्‍या संधींची पूर्तता आणि अनुभव देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात मदत करतो. पुण्यात दुस-यांदा मिस्टर अँड मिस एलिट स्पर्धा आयोजित होत आहे. प्रश्नोत्तरांची फेरी, परिचय फेरी, रॅम्प वॉक आणि टॅलेंट राऊंड अशा विविध प्रक्रियेतून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.  विजेत्यांना रोख पारितोषिक , पोर्टफोलिओ शूट, ब्रँड शूट, मॉडेलिंग असाईनमेंट, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळणार आहे.

प्रिया राणा, स्टार्सट्रीम एन्टाईनमेंटच्या मॅनेजिंग पार्टनर म्हणाल्या, हि स्पर्धा ऑनलाइन ऑडिशन्सने सुरू झाली आणि आम्हाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ज्यामध्ये शंभरहून अधिक स्पर्धकांनी ऑनलाइन ऑडिशनमध्ये भाग घेतला. अंतिम फेरीसाठी 20 पुरुष आणि 20 महिलांची निवड झाली. अंतिम फेरीसाठी हे सर्व स्पर्धक 2 दिवस कठोर प्रशिक्षण घेत आहेत. पुणे एलिट २०२० च्या प्रतिष्ठित विजेतेपदासाठी या स्पर्धकांची लढत होणार आहे. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर आधारित स्पर्धकांचा निवाडा केला जाईल. विजेते ठरविण्यासाठी प्रश्‍न उत्तरांची फेरी, परिचय फेरी, रॅम्प वॉक आणि टॅलेंट राऊंड, पोशाख आणि मेकअपवर लक्ष देण्यात येईल. केवळ 1 पुरुष स्पर्धक आणि 1 महिला स्पर्धकच विजेतेपद मिळवू शकेल.

डिजायनर ममता मंगलाणी, फेमिना मिसेस स्वाती सराफ, सेलेब्रिटी फोटोग्राफर अर्णब घोष, विनोद यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment