Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बलात्कारी पोलीस निरीक्षकाला अटक उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांची धडाकेबाज कामगिरी

 बलात्कारी पोलीस निरीक्षकाला अटक उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांची धडाकेबाज कामगिरी

मिलिंद लोहार-सांगली

कडेगाव जि सांगली येथील बलात्कार करणारा निलंबीत पोलीस निरीक्षक याला अटक झाली असून ही धडाकेबाज कामगिरी तासगाव पोलीस उपाधीक्षका अश्विनी शेंडगे यांनी केली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे....

निलंबीत पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस याला अटक केली आहे.एमपीएससी व युपीएसएसी स्पर्धा परीक्षेसाठी मागदर्शन करण्याबाबत बतावणी करुन पीडीत तरुणीला कडेगाव येथील बंगल्यावर आणुन तिचेवर बलात्कार केला असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक हसबनीस यांच्या विरोधात दिनांक २८.८.२०२० रोजी कडेगाव पोलीस येथे संबधित पीडीत तरुणीने तक्रार दाखल केली होती, पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम,अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती मनिषा दुबुले यांनी याचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे तासगाव विभाग हे या गुन्हयाचा तपास करीत आहेत.

पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेंडाम, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मनिषा दुबुले  यांनी सदरचा गुन्हयातील परांगदा निलंबीत पोलीस निरीक्षक बीपीन व्यंकटेश हसबनीस वय 53 रा मोरेवाडी कोल्हापुर याचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे

उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे तासगाव विभाग याचेकडील एक पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक असे दोन पथक तयार करुन परांगदा निलंबीत

पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस यांचा त्याचे नातेवाईक, पै- पाहुणे, मित्र परीवार , व संभाव्य वास्तव या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता ते पण मिळुन येत नव्हते.

निलंबीत पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी मा उच्च न्यायालय मुंबई कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज  फेटाळला आहे, त्याना आज रोजी दिनांक

१७.१२.२०२० रोजी १३.२३ वा निलंबीत पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांना उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांनी अटक केली असुन कडेगाव न्यायालय येथे हजर केले असता, त्याला दिनांक २३.१२.२०२० रोजी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे  तासगाव विभाग या करीत आहेत.


काय आहे प्रकरण

कडेगाव , पोलीस निरीक्षक बीपीन हसबनीस जून २०१८ मध्ये कडेगाव पोलीस ठाण्यात बदली होऊन रूजू झाले होते. लॉकडाउनच्या काळात मे महिन्यात कारने कोल्हापुरातून कराडच्या दिशेने जाताना त्याला कासेगाव बसस्थानकाजवळ वाहनाच्या प्रतीक्षेत थांबलेली तरुणी दिसली. हसबनीस याने तरुणीला कराडपर्यंत लिफ्ट दिली. प्रवासादरम्यान तिचा मोबाइल नंबर घेतला. ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असल्याने तिला अभ्यासात मदत करण्याच्या भूलथापा दिल्या. यानंतर वारंवार फोन करून कडेगाव येथील घरी बोलवले.
या काळात हसबनीस याने वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद पीडित तरुणीने कडेगाव पोलीस ठाण्यात केली. हा प्रकार एप्रिल ते जुलै दरम्यान घडला. याबाबत कोणाला सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकीही हसबनीस याने पीडितेला दिली होती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies