पुण्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सचिवाचा राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सातारा दौऱ्यावर
कुलदीप मोहिते कराड
आशिया खंडातील सर्वात मोठी व नामांकित रयत शिक्षण संस्था ह्या रयत शिक्षण संस्थेच्या सचिवांनी काल राजीनामा दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे आणि ह्याची दखल खुद्द शरदचंद्रजी पवार यांनी घेतली आहे कोणत्या कारणामुळे हा राजीनामा दिला कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहणार आहेत दरम्यान या बैठकीत काय चर्चा होणार सचिवांच्या राजीनाम्यानंतर शरदचंद्रजी पवार काय निर्णय घेणार यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे