निरोप देणे आणि त्याने आपला निरोप घेणे हा केवळ शिष्टाचार नसतो. तो आमच्या संस्कृतीचा सहज, आवश्यक आविष्कार असतो:-अशोक थोरात
अमूलकुमार जैन-मुरुड
आपल्याकडे आलेला पाहुणा अथवा आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकारीपैकीं एका सहकारी याची कामानिमित्त इतर ठिकाणी बदली होते तेव्हा आपण त्याला निरोप देणे आणि त्याने आपला निरोप घेणे हा केवळ शिष्टाचार नसतो. तो आमच्या संस्कृतीचा सहज, आवश्यक आविष्कार असतो. असे प्रतिपादन रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांच्या निरोपसभारंभ कार्यक्रमात केले. अशोक थोरात यांनी पुढे सांगितले की,पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांच्यासह काम करीत असताना जवळपास वीस ते पंचवीस दिवस झाले आहेत.या दिवसात हिंगे यांच्या कामाची पद्धत ही वेगळी असून कोणत्याही केसचा तपास करीत असताना वरिष्ठांचे तसेच आपल्या सहकारी यांचे मार्गदर्शन वजा सल्ला घेवून काम करीत आहेत,त्यांच्या ह्या कामाची ही पद्धत मी माझ्या इतक्या वर्षाच्या नोकरीच्या कार्यकाळात कुठंही बघितली नाही.हिंगे यांना पोलीस खात्यात दाखल होऊन पाच वर्षे झाली आहेत .त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात पुढे जायचे आहे .सेवेत असताना सेवेत असताना कोणत्याही प्रकारचे संकट आले तरी त्यांना परतवून लावण्याची टाकत त्यांना यावी यासाठी ईश्वराकडे प्रार्थना आहे तसेच त्यांच्या भावी काळासाठी रेवदंडा पोलीस कर्मचारी परिवारातर्फे शुभेच्छा आहेत,असेही थोरात यांनी सांगितले.
यावेळी हर्षद हिंगे यांनी सांगितले की मी 2015 मध्ये पोलीस विभागात रुजू झालो माझी ऑक्टोबर2017 मध्ये रेवदंडा पोलिस ठाण्यात पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.मी काम करीत असताना मला नेहमी माझे वरिष्ठ आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.कधी कधी पोलीस शिपाई ते हवालदार यांच्या कडूनही त्यांचे सल्ले ही मोलाचे ठरले आहेत.माझी रेवदंडा सोडून जाण्याची इच्छा नाही पण शासनाच्या नियमानुसार माझा कार्यकाळ संपला असल्याने मला येथून जावे लागत आहे.येथून जात असताना येथील प्रत्येकाची आठवण तर येईलच तसेच मी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भेटण्यासाठी येईन,असे हिंगे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी यांनीसुद्धा पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांच्यासोबत केलेल्या कामगिरी बाबत माहिती कथन केली.यावेळी हर्षद हिंगे यांना मुरुड तालुका पत्रकारसंघाच्या वतीने सुद्धा त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.
.