नांदगावच्या नुतन नर्सिंगस्कूल मध्ये जागतिक एड्स दिन साजरा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 1, 2020

नांदगावच्या नुतन नर्सिंगस्कूल मध्ये जागतिक एड्स दिन साजरा

 नांदगावच्या नुतन नर्सिंगस्कूल मध्ये जागतिक एड्स दिन साजरा

       अमूलकुमार जैन-मुरुड


मुरुड ग्रामीण रुग्णालयातील आय.सी.टी.सी.विभाग व नुतन नर्सिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव येथील नुतन नर्सिंग स्कूल मधे जागतिक एड्स दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. 

        ग्रामीण रुग्णालय आय.सी.टी.सी.विभागाचे समुपदेशक, सचीन जाधव, समीर धांडुरे, प्राचार्य व्ही.जी.उबाले, शिक्षक सागर माळी, मयुरी पुलेकर, नयना उबाले, ऋतुजा धोत्रे शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते.यावेळी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अटि,नियम व शर्तीचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  यावेळी नुतन नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयोजित रांगोळी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रांगोळी व पोस्टर्स चे सादरीकरण केले.सचीन जाधव व समीर धांडुरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले व विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही.(एड्स) या रोगाबद्दल मार्गदर्शनपर मोलाची माहिती दिली. शेवटी सागर माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

   


No comments:

Post a Comment