"धरा किंवा मारा"असं असताना शार्प शूटरच्या डोळ्यात तेल घालून बिबट्या पसार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, December 7, 2020

"धरा किंवा मारा"असं असताना शार्प शूटरच्या डोळ्यात तेल घालून बिबट्या पसार

 "धरा किंवा मारा"असं असताना शार्प शूटरच्या डोळ्यात तेल घालून बिबट्या पसार

बिबट्या पकडण्यासाठी 5 एकर ऊसाला लावली आग

महाराष्ट्र मिरर वृत्तसोलापूर जिल्ह्यातील करमाळयात धुडगूस घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला धरा किंवा मारा असे वन विभागाचे आदेश आहेत.काल त्याने एका ऊसतोड कामगाराच्या मुलीला शेतातून ओढून नेत ठार केले.माणसाचं रक्त प्यायला आणि मांस खायला चटवलेल्या बिबट्याने अक्षरशः धुडगूस घातला असून मोहोळ आणि बीड वन परिक्षेत्रात आतापर्यंत 11 लोकांचा जीव घेतला आहे,त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.नरभक्षक बिबट्याचा उपद्रव वाढू लागल्याने त्याला धरा नाहीतर मारा असे आदेश काढून काल शार्प शूटरही लावले.काल ज्या राजेंद्र बारकुंड यांच्या शेतातून 9 वर्षाच्या मुलीवर हल्ला करून मारणारा बिबट्या त्याच परिसरात दबा धरून बसल्याचे लक्षात आल्याने चारी बाजूने  शार्प शूटर लावून एक बाजूला वाघर लावण्यात आले आणि त्याच बारकुंड यांच्या 5 एकर ऊसाला आग लावून देण्यात आली पण सगळं व्यर्थ ठरलं आणि शार्प शूटरच्या डोळ्यात तेल घालून बिबट्याने तेथून धूम स्टाईलने पलायन केलं.

No comments:

Post a Comment