सातारा जिल्ह्यातील भुरकवडी गावाने रचला सुवर्ण इतिहास राज्यात प्रथमच महिलांची ग्रामपंचायत - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

सातारा जिल्ह्यातील भुरकवडी गावाने रचला सुवर्ण इतिहास राज्यात प्रथमच महिलांची ग्रामपंचायत

 सातारा जिल्ह्यातील भुरकवडी गावाने रचला सुवर्ण इतिहास राज्यात प्रथमच महिलांची ग्रामपंचायत

राज्यातील इतर ग्रामपंचायती समोर ठेवला आदर्श

प्रतिक मिसाळ -साताराराज्यातील सुमारे १४ हजार हुन जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून सरपंच पदाचे आरक्षण निवडणूक निकालानंतर होणार असल्याचे निवडणूक आयोग व शासनाने जाहीर केले आहे . काही गावा मधील नेतेमंडळी ग्रामपंचायत बिनविरोध करून शासनाचे बक्षीस मिळवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत , तर काहीजण " गावराणी खोडा " घालण्यात मग्न आहेत , मात्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील अशा एका गावानं ग्रामपंचायत बिनविरोध तर केलीच पण ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य महिलांची बिनविरोध निवड करून एक इतिहास रचला आहे , त्या गावचं नाव आहे " भुरकवडी " सद्यस्थितीत राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे वारे वहात असून त्या निमित्ताने आता गावा - गावात गट - तट पहायला मिळत आहेत . गावातील जेष्ठ नागरिक , युवक वर्ग , नोकरदार वर्ग यांनी एकत्रित येत एका नव्या बदलाची सुरवात आपल्या गावापासून केली आहे मा ना शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राज्यातील महिलांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून महराष्ट्रात पहिले महिलां धोरण आणत महिलांना 33 % टक्के आरक्षण दिले आहे . पवार साहेबाच्या याच विचारधारेवर चालत असताना मु पो भुरकवडी ता खटाव जि सातारा या गावातील ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे उचलून राज्यासमोर नवा आदर्श निर्माण करीत भुरकवडी ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना १०० % आरक्षण देण्याचा मान पटकवला . भुरकवडी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सद्यस्य पुढील प्रमाणे खुला वर्ग - सौ ललिता छगन कदम , सौ रेशमा सचिन कदम , सौ मनीषा दत्तात्रय कदम सौ शीतल किरण कदम सौ रंजना मधुकर मागास प्रवर्ग -सौ सुजाता हणमंत गाढवे सौ सुलोचना चंद्रकांत कुंभार अशा प्रकारे निवडी केल्या असून सर्व नवनिर्वाचित सदस्यांना पुढील वाटचालीस तालुक्यातील जनतेने शुभेच्छा दिल्या आहेत , नवनिर्वाचित महिला सदस्यांनी जोमाने कामाला लागन राज्यासमोर नवा आदर्श निर्माण करावा , अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.

No comments:

Post a Comment