3 डिसेंबर जागतिक अपंग दिना निमित्त जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था उंब्रज यांच्यामार्फत दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
कुलदीप मोहिते -कराड
3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था उंब्रज यांच्यामार्फत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन निरकर भवन उंब्रज येथे करण्यात आले होते सध्या कोरोना महामारी चे सावट असल्यामुळे हा मेळावा शासनाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करून अगदी साध्या पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड व प्रमुख पाहुणे उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संजय कुंभार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद साळुंखे यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त करून मेळाव्यास मार्गदर्शन केले
दिव्यांग बांधवांना लागणारी सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचे ठोस आश्वासन डॉक्टर कुंभार यांनी यावेळी दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिव्यांगांच्या समस्या जाणून घेतल्या व उंब्रज पोलीस स्टेशनच्या वतीने लागेल ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले व कोरोना विरुद्धच्या लढ्याला दिव्यांग बांधव ज्या सहासी वृत्तीने सामोरे गेले त्या वृत्तीचे ही कौतुक अजय गोरड यांनी केले राष्ट्रीय हॉलीबॉल पट्टू तपस्या काशीद हिचा सत्कारही अजय गोरड यांनी यावेळी केला
या कार्यक्रमास उंब्रज ग्रामपंचायतीचे तलाठी संदीप काळे मंडलाधिकारी युवराज काटे या मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे आयोजन रमेश जाधव दीपक खडग प्रमोद गायकवाड अनिल आटोळे दिगंबर भांदिर्गे सागर स्वामी महेश काशीद अरविंद जाधव उमेश शेटके सुनील हजारे यांनी केले तसेच या मार्गदर्शक मेळाव्यास उंब्रज परिसरातील दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था उंब्रज यांनी राबवलेले सामाजिक उपक्रम असो व वा कोरोना महा मारी च्या कालखंडामध्ये केलेले मास्क सॅनिटायझर वाटप कोरोना विषयी जनजागृती निश्चितच प्रेरणादायी आहे