सर्व स्तरातील विरोध झुगारून स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध करावे : ऍड.मनिषा रोटे यांचे प्रतिपादन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 2, 2020

सर्व स्तरातील विरोध झुगारून स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध करावे : ऍड.मनिषा रोटे यांचे प्रतिपादन

 सर्व स्तरातील विरोध झुगारून स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध करावे : ऍड.मनिषा रोटे यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा फौंडेशनचा राज्यस्तरीय स्त्री प्रतिष्ठा सन्मान सोहळा २०२० उत्साहात

उमेश पाटील -सांगली


सर्व स्तरातील विरोध झुगारून स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध करावे, असे आवाहन राष्ट्रीय महिला कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनाथांच्या माई ज्येष्ठ समाजसेविका ऍड. मनिषा रोटे (माई) यांनी केले. प्रतिष्ठा फौंडेशनच्या चौथ्या स्त्री प्रतिष्ठा सन्मान सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील महिलांचा यावेळी स्त्री प्रतिष्ठा सन्मान पुरस्कारने गौरव करण्यात आला. सांगलीतील टिळक स्मारक भवनमध्ये हा सोहळा  उत्साहात झाला.
ऍड. मनिषा रोटे (माई) पुढे म्हणाल्या, स्त्री हि अपराजिता आहे, सक्षमा आहे. दहा अंगांनी ती संसार संभाळत असते. परंतु ती सामाजिक, राजकीय अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवू लागली कि तिला शारिक व मानसिक विरोधाला समोर जावे लागते. परुंतु या सगळ्यावर मात करून स्त्रियांनी पुढे आले पाहिजे. आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे.

प्रतिष्ठा जाधव यांनी स्वागत केले. तानाजी जाधव प्रास्ताविक केले. नामदेव भोसले यांनी

ऍड. मनिषा रोटे यांच्या हस्ते राज्यभरातील महिलांचा स्त्री प्रतिष्ठा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. स्त्री प्रतिष्ठा माता सन्मान पुरस्कार- विमल विठ्ठल काळेबेरे (सांगली); स्त्री प्रतिष्ठा समाजसेविका सन्मान पुरस्कार -  मोनिका डांटस (ज्येष्ठ समाजसेविका, कळंबोली, नवीमुंबई), निर्मला पांडुरंग रोडे (समाजसेविका, मिरज), आशा सुनिल पाटील (शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती, सांगली जिल्हा परिषद, सांगली),  ज्योती दीपक अवघडे (वरवणे, ता. पेण. जि. रायगड), प्रेमलाताई वसंतराव साळी (सांगली हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सांगली); स्त्री प्रतिष्ठा साहित्यिका सन्मान पुरस्कार - श्लेषाताई कारंडे (साहित्यिका, पत्रकार, शिक्षिका, महुद बुद्रुक ता. सांगोला जि. सोलापूर),  सुषमा अशोक डांगे (साहित्यिका/शिक्षिका सांगली),  प्रा. शारदा बियाणी (श्रीमती एल. आर. टी. कॉमर्स कॉलेज, अकोला), प्रा. रत्ना चौधरी - नागरे (रामनगर, वर्धा), प्रा. सविता दुधभाते (उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर), अनिता यशवंत साळवे (जि. प. शाळा निघू, ता. कल्याण. जि. ठाणे), स्त्री प्रतिष्ठा उद्योजिका सन्मान पुरस्कार - स्मिता लंगडे (उद्योजिका, सत्यर्थ इंटरप्रायजेस, कोल्हापूर),  सुमित्रा फराकटे (उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या, नंदीनी गारमेंट, कोल्हापूर), विद्या रमेश चव्हाण (मारव्हलस ब्युटी ऍण्ड स्पा कोल्हापूर), स्त्री प्रतिष्ठा विशेष साहित्य सन्मान पुरस्कार - बियॉन्ड सेक्स (कांदबरी) लेखिका- सोनल गोडबोले, पुणे) यांचा स्त्री प्रतिष्ठा सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment