Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचा स्मृती दिन साजरा ,माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्या कार्याचा गुणगौरव

 बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचा स्मृती दिन साजरा ,माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्या कार्याचा गुणगौरव

अमूलकुमार जैन -मुरुड


आज मुरुड येथील वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यलयात कोकणचे सुपुत्र  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए,आर.अंतुले (Barrister A.R. Antule) यांचा स्मृती  दिन साजरा करण्यात आला आहे.यावेळी असंख्य वक्त्यांनी अंतुले यांच्या कार्याचा उजाळा देत विविध खाती सांभाळताना घेतलेले धाडसी निर्णय व सामाजिक कार्य विषद करण्यात आले.

   सदरील कार्यक्रमास मुरुड तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष सुभाष महाडिक,ऍड इस्माईल घोले,कॉग्रेस पक्षाचे नेते राजाभाऊ ठाकूर,महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सरोज डाकी,वासंती उमरोटकर नगरसेविका आरती गुरव,नगरसेवक विश्वास चव्हाण,मुरुड शहर अध्यक्ष नाना गुरव,तालुका उपाध्यक्ष सुदेश वाणी,सज्जाद हसवारे,उपसरपंच प्रीतम पाटील,जेष्ठ नेते नजीर चोगले, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 मुरुड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष महाडिक यांनी सांगितले कि, बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी उच्चं शिक्षण घेऊन सारे आयुष्य गोर गरिबांच्या कल्याणासाठी घालवले आहे.संजय गांधी निराधार योजना प्रभावी पणे राबवून गरीब जनतेचे कल्याण केले.गुजरात सरकारने वलभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोठा पुतळा उभारला आहे.त्याच प्रमाणे महाराष्ट्र सरकारने बॅरिस्टर ए.आर अंतुलेंचा मोठा पुतळा त्यांच्या जन्मगावी उभारून त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे असे मत व्यक्त केले. कोरोना विषाणूंवर प्रतिबंध आणणारी लस सापडत नाही परंतु जर बॅरिस्टर अंतुले साहेब असते तर देश विदेशातून त्यांनी तातडीने लस आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले असते.असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

    काँग्रेस नेते राजा ठाकूर यांनी भावी पिढीला बॅरीस्टर ए.आर अंतुले यांचे कार्य कळावे यासाठीच स्मृती दिन साजरा होणे आवश्यक आहे.व्हिजन असणारा नेता म्हणजे अंतुले साहेब त्यांनी रेवस रेड्डीची संकल्पना मांडून कोकणाला विकासाच्या दिशेने नेले होते.आर.सी.एफ. व अनेक कंपन्या आणून रायगड जिल्ह्याचा विकास करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.साळाव पूल व ग्रामीण भागातील अनेक पूल निर्माण करून ग्रामीण भाग शहराला जोडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

 वासंती उमरोटकर ,नजीर चोगले,महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सरोज डाकी नगरसेवक विश्वास चव्हाण आदी मान्यवरांची सुद्धा भाषणे संपन्न झाली.

सर्व वक्त्यांनी माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies