सैदापूर( कराड) एकाच कुटुंबातील सख्या तीन बहिणींचा अकाली मृत्यु - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

सैदापूर( कराड) एकाच कुटुंबातील सख्या तीन बहिणींचा अकाली मृत्यु

 सैदापूर( कराड) एकाच कुटुंबातील सख्या तीन बहिणींचा अकाली मृत्यु

कुलदीप मोहिते कराड
नुकताच झालेला  अल्पवयीन मुलाचा खून कराड बस स्टॅन्ड समोरील निनावी बॅग ही प्रकरण ताजी असतानाच  शुक्रवारी सकाळी सैदापूर येथील एकाच कुटुंबातील तीन बहिणीच्या अकाली मृत्यूमुळे कराड व आजूबाजूचा परिसर पुन्हा हादरला आहे ही घटना कराड तालुक्यातील सैदापूर येथील आहे गुरुवारी रात्री कुटुंबासमवेत एकत्र जेवण केल्यानंतर संबंधित मुलींना व तिच्या आईला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला त्यांना  कृष्णा हॉस्पिटल मध्ये त्वरित उपचारासाठी दाखल करण्यात आले तीन मुलींना जास्त त्रास होत असल्यामुळे त्यांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला तिन्ही मुलींच्या अकाली जाण्यामुळे   सासवे  कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे हे कुटुंब सैदापूर येथील मिलिटरी होस्टेलच्या  नजीक वास्तव्यास होते आयुशी शिवानंद  सासवे  वय वर्ष 3 आस्था शिवानंद  सासवे सर्वे वय वर्ष नऊ आरुषी शिवानंद   सासवे वय वर्षे आठ अशी मुलींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले अन्नातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे घटनेचा अधिक तपास करीत आहेत दरम्यान मृत्यू झालेल्या मुलीचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे व तो पुण्यातील प्रयोगशाळेत अधिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment