पाटण कराड तालुक्यातील ग्रामपंचायत मनसे लढणार
पाटण कराड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मनसे लढणार -अँड विकास पवार --जिल्हा अध्यक्ष
हेमंत पाटील -पाटण
महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या ग्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यात लागलेल्या निवडणुकी संदर्भात बुधवार दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी पाटण तालुका पदाधिकारी व मनसैनिक यांची जिल्हाध्यक्ष अँड विकास पवार व तालुका अध्यक्ष गोरख नारकर याचे अध्यक्षतेखाली मिटिंग लावणेत आलेली होती. या बैठकीस पाटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे, संजय सत्रे, राहुल संकपाळ, कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे, नेरळे शाखा अध्यक्ष राम माने, मोरणा विभाग अध्यक्ष जितेंद्र कवर, मरळी विभाग अध्यक्ष हणमंतराव पवार, चित्रपट सेना तालुका अध्यक्ष नितीन बाबर, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष राहुल संकपाळ,
स्वयं रोजगार सेना तालुका अध्यक्ष संभाजी चव्हाण, सतिश यादव पैलवान इत्यादी सर्व पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते. होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकी बाबतीत योग्य ती व्युहरचना करून मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्याशी नारकर , व पवार यांनी सम्पर्क साधून निवडणुकीमध्ये येणाऱ्या काही अडचणी संदर्भात त्रुटी मांडण्यात आल्या त्या बाबतीत नांदगावकर यांच्या कडून सर्वांना मार्गदर्शन मिळाले. व येणाऱ्या निवडणुकीसाठी जोराने कामाला लागा आम्ही आहोत... अशी ग्वाही देणेत आली,
सर्व उपस्थित पदाधिकारी व मनसैनिकांचे आभार शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे यांनी आभार मानले.....