अज्ञात इसमाकडून गुरांसाठी घेतलेल्या पेंढ्याला आग ;
पूर्व वैमनस्यातून हे कृत्य केले असल्याची शंका?
नरेश कोळंबे -कर्जत
कर्जत तालुक्यातील सालवड येथील गुरेपालन करणाऱ्या व्यावसायिकाच्या 70000 पेंढ्याला आग लावण्याचे कृत्य अज्ञात इसमांनी केले आहे. ह्यात 50000 पेंढा जळून खाक झाला आहे. त्यामुळे मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
कर्जत तालुक्यातील साळवड येथे राहत असलेले विलास भोसले हे दुग्ध व्यवसाय करत असून त्यांनी आपल्या म्हशी साठी 70000 एवढ्या पेंढ्याची खरेदी आपल्या जागेत करून ठेवली होती. परंतु रात्रीचा फायदा घेत कोणीतरी सर्व पेंढ्या पेटवून देत विलास भोसले यांचा आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्जत तालुक्यातील सालवड येथे 22 तारखेला रात्री 8.30 च्य आसपास विलास भोसले म्हशी बांधून घरी आल्यानंतर 9 च्या सुमारास कोणीतरी सर्व पेंढ्याना आग लावण्याचे कृत्य केले असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये 70000 पेंढ्या पैकी 50000 पेंढा हा जळून खाक झाला तर 20000 पेंढा वाचविण्यात गावातील मुलांना यश आले. सदर आग विझविण्यासाठी पाण्याचे दोन टँकर व अग्निशमन दलाची गाडी योग्य वेळेवर आल्याने सदर आग विझवली गेली असल्याचे सांगण्यात येते आहे .असाच पेंढा जाळण्याच कृत्य आधीही केल गेलं असल्याने आरोपीला लवकरात लवकर पकडुन शिक्षा करावी अशी मागणी विलास भोसले यांनी केली असून सदर कृत्याची तक्रार कर्जत पोलीस ठाणे येथे केली आहे व पोलिस पुढील चौकशी करत आहेत.
No comments:
Post a Comment