कोर्लई किल्ल्यातील तोफेला नवसंजीवनी देण्यात आली..... सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाचे गौरवास्पद कार्य... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

कोर्लई किल्ल्यातील तोफेला नवसंजीवनी देण्यात आली..... सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाचे गौरवास्पद कार्य...

कोर्लई किल्ल्यातील तोफेला नवसंजीवनी देण्यात आली.....
              सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाचे गौरवास्पद कार्य...

अनेक वर्षांपासून भरतीत समुद्राच्या खाऱ्या पाण्यात असणारी व इतिहासातुन लुप्त होत चाललेल्या तोफेला संजीवनी ....

अमूलकुमार जैन-मुरुड केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कोर्लई किल्ल्यावर एकूण २५ तोफेची नोंद आहे. परंतू गेल्या कित्येक वर्षात त्यातील एक तोफ गायब झाली होती. हजारो दुर्गप्रेमींना तर याची तसूभर कल्पनाही नव्हती. परंतू गेल्या रविवारी म्हणजे १३ डिसेंबरला अलिबाग विभागाने ह्या तोफेची शोधमोहीम हाती घेतली. स्थानिक पुरातत्व विभागाचे अधिकारी व आसपासच्या ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. स्थानिक कोळी लोकांच्या भेटीत त्यांनी सांगितलं की एक तोफ समुद्राकडील बाजूस भरतीत पूर्ण पाण्याखाली असते व ओहोटीच्या वेळी ती तेथील दगडात दिसून येते. लगेचच सोमवारी ओहोटीची वेळ होती. अधिक वेळ न दवडता कार्यालयीन काम सोडून अलिबागचे दुर्गसेवक तिथे मिळेल त्या साहित्याने तिथे कोर्लई किल्ल्यावर पोहोंचले. ज्या दगडांवर नीट उभे राहता येत नाही तेथून ती तोफ ४ तासाच्या कष्टातून सुखरूप किल्ल्यावर आणून ठेवली. इतकंच नाहीतर तेथील असणाऱ्या एकूण २५ तोफांची मोजणी करून त्यास क्रमांकसुद्धा देण्यात आले. हि तोफ पुढील शेकडो वर्षे इतिहासाची साक्ष देईलच.हे ईश्वरी काम करण्याचं भाग्य सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाला मिळालं हे त्यांच्या आजवर दुर्गसंवर्धन केलेल्या कार्याच फळ आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित असलेले दुर्गसेवक यांनी दिली.

 सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाचे दुर्गसेवक अध्यक्ष सिद्धेश शेनवईकर,उपाध्यक्ष संदिप पाडेकर,सन्मेश नाईक, साहिल पाटील, नयन कवळे, अमित ठाकुर, ऊपेंद्र बलकवडे, दिनेश गायकर, सिद्धराज भोसले, संजय पाडेकर, विलास सुर्वे

हे उपस्थित होत

     तसेच  केंद्र पुरातत्व विभागाकडे या तोफेची नोंद करून तिला संरक्षित स्मारक करून संरक्षक करावे असा पत्रव्यवहार करण्यात आला आहे असे आणि सह्याद्री प्रतिष्ठान पुढेही संवर्धनासाठी तत्पर असेल असेल असे अलिबाग विभाग अध्यक्ष सिद्धेश शेनवईकर यांनी सांगितले

No comments:

Post a Comment