Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नगरपंचायत उमेदवारांची नवी नवलाई युवा पत्रकार प्रमोद जाधव निवडणुकीसाठी उत्साही

 नगरपंचायत उमेदवारांची नवी नवलाई युवा पत्रकार प्रमोद जाधव निवडणुकीसाठी उत्साही

रविंद्र कुवेसकर-उतेखोल/माणगांव

नगरपंचायत निवडणुक आरक्षण जाहीर झाल्यानंतर विद्यमान नगरसेवकांपुढे कुठल्या प्रभागातुन काेण उभे राहणार ? असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अश्यातच महाविकास आघाडी हाेणार की शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकमेका विराेधात लढणार या बाबत भुमिका अद्याप अस्पष्ट आहे. प्रभाग क्र.३ मधुन साईनगर मधील युवा पत्रकार तसेच माणगांव तालुका नाभिक समाजाचे तडफदार नेतृत्व प्रमाेद जाधव भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. निवडणुक लढविणे सोपे नाही तरीही सामाजीक कार्याची आवड असलेले विविध क्षेत्रातील युवा कार्यकर्ते ही निवडणुक लढविण्यास उत्साही असल्याची जोरदार चर्चा माणगांव मध्ये आहे.

अनेक मुलभुत साेयी सुविधांचा अभाव आहे, पाणी पुरवठा समस्या, मागील काही वर्षात झालेल्या अंतर्गत काँक्रीट रस्त्यांची दुरावस्था हेच प्रश्न जनतेसमाेर घेऊन मी निवडणुकीला सामाेरे जाणार असल्याचे मत देखील जाधव याने व्यक्त करीत भारतीय जनता पार्टीकडुन माणगांव शहर सरचिटणिस प्रमाेद जाधव यांना पक्षाचा ए बी फाॅर्म पक्षश्रेष्ठींकडुन मिळवुन देणार असल्याचे सुचक वक्तव्य देखील भाजपाचे माणगांव शहराध्यक्ष राजु मुंडे यांनी केले असल्याची माहीती त्याने दिली. या आधी प्रभागातुन भाग्यश्री आनंद यादव निवडुन आल्या आहेत. राष्ट्रवादीचे नाराज नेतृत्व या प्रभागातुन अपक्ष निवडणुक लढविणार असल्याची शक्यता असल्याचे त्याने सांगितले.


प्रमोद जाधव हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असुन त्याने समाजसेवेची M.S.W (master in social welfare) ही पदवी संपादीत केली आहे. मुळातच समाजसेवेची आवड आणि निवडलेल्या प्रभाग क्र. ३ मध्ये बहुसंख्य मतदार हे त्याचे समाजबांधव व प्रभागात बालपण गेल्याने साईनगर पुर्व मधील त्याचे आप्तेष्टच मतदार असल्याने त्याचा फायदा देखील त्याला हाेणार असल्याचे त्याचे म्हणने आहे. रात्री अपरात्री मुंबई गाेवा हायवेवर झालेल्या अपघातप्रसंगी किंवा गाेरगरीबांवरील अन्यायाला वाचा फाेडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रमाेद याने स्वप्नदिप युथफाऊंडेशनच्या माध्यमातुन वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित प्रभागातील साईनगर पुर्व व पश्चिम लाेकमान्य मित्रमंडळ, मैत्री पार्क या परीसरात दांडगा जनसंपर्क ठेवला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies