छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्यावर भर
निरंजन पाटील-कोल्हापूर
--समाजामध्ये समानता , बंधुता आणि सर्व घटकांसाठी समान संधी उपलब्ध होण्यासाठी कोल्हापुरातील शाहू महाराजांचे योगदान मोठे असून व त्यांनी सर्वप्रथम कष्टकरी वंचित उपेक्षित घटकांसाठी आरक्षणाची क्रांतिकारी सुरुवात केली. याच विचारांचा वारसा जपण्याचा मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट नवी दिल्ली संपूर्ण भारतभर करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल यांनी कोल्हापूर येथे कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले. .
यावेळी कोविंड काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच राष्ट्रीय सहसचिव मोहम्मद यासीन शेख यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रीय सहसचिव , अशी पदोन्नती देण्यात आली . शिव शाहीर आझाद नायकवडी यांची महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी निवडीची घोषणा किशन गोयल यांनी केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे ओळखपत्र यांचे वाटप करण्यात आले.
राधानगरी तालुका अध्यक्ष याकुब बक्क्षू,निवास हुजरे,समसुदीन जमादार, वीरभद्र ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र कांबळे व कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.