Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात चिंचणेर निंब येथे अंत्यसंस्कार

 शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात चिंचणेर निंब येथे अंत्यसंस्कार

प्रतिक मिसाळ -सातारा शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर आज चिंचणेर निंब येथे पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी आमदार शशिकांत शिंदे , आमदार महेश शिंदे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल , प्रांताधिकारी मिनाज मुल्ला , तहसीलदार आशा होळकर , सहायक पोलीस अधीक्षक अँचल दलाल , कमांडर स्टेशन हेडक्वार्टर कोल्हापूरचे कर्नल पराग गुप्ते यांनी शहीद जवान सुजित किर्दत यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली . शहीद जवान सुजित किर्दत यांना मानवंदना देऊन कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले . त्यानंतर लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली . मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता . चौकाचौकात आदरांजलीचे फ्लेक्स लावले होते . ' अमर रहे अमर रहे सुजित किर्दत अमर रहे , भारत माता की जय ' अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली . सैन्य दल व पोलिस दलामार्फत पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली पोलीस दलाच्या व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली . पिता नवनाथ पत्नी सुवर्णा मुलगा आर्यन , मुलगी इच्छा भाऊ अजित यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले . शहीद सुजित किर्दत यांचा मुलगा आर्यन यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले . यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील , सातारच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्यासह लष्कराचे विविध आजी माजी अधिकारी विविध विभागाचे अधिकारी आणि हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies