Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोषात कोरोना महामारी च्या सावटाखाली जिल्ह्यामध्ये दत्त जयंती सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला

 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोषात कोरोना महामारी च्या सावटाखाली जिल्ह्यामध्ये दत्त जयंती सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला

कुलदीप मोहिते -कराड



:   दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा होणारा दत्तजन्म सोहळा यावर्षी कोरोनाच्या महामारी च्या पार्श्वभूमीवर  जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून अगदी साध्या पद्धतीने दत्त जयंती सोहळा  पार पडला. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा जयघोष आणि दत्तदर्शनाची लगबग अशा भक्तिमय वातावरणाचा प्रत्यय जिल्ह्यामध्ये सर्वत्र  दिसून आला

सातारा शहरातील आनंदवाडी दत्त मंदिर, प्रतापगंज पेठेतील मुतालिक दत्त मंदिर, सज्जनगड येथील समाधी मंदिरापुढील दत्त मंदिर तसेच सातारा शहरातील गेंडामाळ परिसरातील श्री दत्त मंदिरात त्याचबरोबर फलटण, काळज, लोणंद येथील ढाळे कुटुंबीयांचे दत्त मंदिर त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध एसटी आगारातील दत्त मंदिरांमध्ये हा जन्मोत्सव सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी साजरा झाला सातारा शहरातील मुतालिक दत्त मंदिरात तीन दिवस झालेल्या जयंती सोहळ्यानिमित्त सोमवारी सायंकाळी मंत्रजागर करण्यात आला. मंगळवारी जयंतीदिनी सकाळी दत्तयाग होऊन सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दत्त जन्म करण्यात आला. बुधवारी सकाळी लघुरुद्राचे पठण होऊन या जन्म सोहळ्याची सांगता होणार आहे

मुतालिक दत्त मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक वेदमूर्ती गोविंदशास्त्री जोशी यांनी माहिती देताना सांगितले, की दरवर्षीप्रमाणे यावर्षी जन्मकाळाचे कीर्तन कोरोनामुळे रद्द करून केवळ दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले ठेवण्यात आले होते. जन्मकाळानंतर भाविकांना सुंठवडा आणि प्रसाद वितरण करण्यात आला. कराडमध्ये ही दत्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच  भाविकांना  योग्य ते सोशल डिस्टंसिंग चे पालन करून व मास्कचा वापर करून दत्त मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येत होते मात्र दरवर्षीप्रमाणे अनेक मंदिरांमध्ये होणारे महाप्रसादाचे कार्यक्रम यावर्षी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर  रद्द करण्यात आले होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies