आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते मेढा येथे कोट्यावधी निधीच्या विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते मेढा येथे कोट्यावधी निधीच्या विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन

 आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते मेढा येथे कोट्यावधी निधीच्या विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन

प्रतिक मिसाळ- सातारा



 एक आमदार म्हणून मी माझ्या सातारा- जावली मतदारसंघाच्या विकासासाठी , मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे . अनेक प्रश्न मार्गी लावून मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचवली आहे , हे आपण सर्वांनी पहिले आहे . काही लोक काडीचे काम करत नाहीत मात्र फुशारक्या मारून गैरसमज पसरवण्याचे काम करत असतात . त्यांच्याकडे मी फारसे लक्ष नाही . दिलेला शब्द पाळणं , तो पूर्ण करणं हीच माझी कामाची पद्धत आहे आणि हे जावलीकरांनी पाहिलं आहे , असे प्रतिपादन आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले .



 मेढा येथे आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मेढा नगर पंचायतीच्या माध्यमातून २ कोटी पेक्षा जास्त निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे उदघाटन आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले . यामध्ये चांदणी चौक ते देशमुख आळी रस्ता व गटर , चांदणी चौक ते लक्ष्मी मंदिर रस्ता व गटर , चांदणी चौक ते कुंभारवाडा रस्ता , श्री स्वामी समर्थ मंदिराजवळील साकव पूल व रस्ता , ओतारी घर ते तांबोळी घर बंदिस्त गटर , चंद्रमानगर मधील डांबरीकरण , गटर , स्ट्रीट लाईट , धबधबा रोड साकव पूल , आगुंडे घर ते धनावडे घर रस्ता , अहिल्यादेवी नगर मधील स्ट्रीट लाईट , प्रभाग क्र १७ मधील रस्ता आदी कामांचा समावेश आहे . याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल शिंदे , उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार , माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ , माजी उपसभापती कांतीभाई देशमुख , उद्योजक विजय शेलार , भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा गीता लोखंडे , रामभाऊ शेलार , बांधकाम सभापती वंदना सपकाळ , आरोग्य सभापती संजना सावंत , नगरसेवक नारायण देशमुख , विकास देशपांडे , शशिकांत गुरव , सनील तांबे , सुनीता तांबे , दीपाली शिंदे , कल्पना जवळ , शुभांगी गोरे , दत्तात्रय वारागडे , संतोष वारागडे , सुजित जवळ , नंदकुमार गाडगीळ , बाळासाहेब सपकाळ , एन . के . धनावडे , राजू सावंत , दिलीप कुंभार आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते . आ . शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की , आघाडी सरकार असताना मेढा ग्रामपंचातीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला . या नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळत नव्हता . नगरपंचायतीच्या सक्षम कारभारासाठी मुख्याधिकारी अत्यावश्यक असतो . आपण मुख्याधिकारी आणले . विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली आणि पुढेही लावणार आहे . मी एखाद्या कामाचा नारळ फोडला कि ते काम पूर्ण होणारच यात शंका नाही आणि त्याची प्रचिती सर्वांनाच आहे . आजच्या कार्यक्रमातील काही कामांना निधी नाही आणि आमदार नारळ फोडणार अशा फुशारक्या काही स्वयंघोषित नेत्यांनी मारल्या आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले . या कामांसाठी मी निधी मिळवण्यासाठी सक्षम आहे . त्यामुळे त्या नेत्यांनी निधी कोठून येणार याची काळजी करू नये , असा टोलाही आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला . दरम्यान , निधी उपलब्ध झालेली कामे लवकर पूर्ण होतील आणि ज्या कामांसाठी निधी आवश्यक आहे त्यासाठी निधी मिळवू आणि तीही कामे मार्गी लावू असा शब्द आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला . सातारा महाबळेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून पर्यटकांची संख्या वाढणार आहे . त्याचा फायदा मेढा शहराला होणार आहे.मेढा हे आता गाव राहिले नसून शहर झाले आहे . आगामी काळात नगरपंचायतीची नगर पालिका होईल आणि मी आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक मिळून शहराचा विकास झपाट्याने करू . त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे , असे आवाहन आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले .

No comments:

Post a Comment