Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

११ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी कार्यकर्ते लागले कामाला , उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्याच्या पध्दतीने वाढली डोकेदुखी

 ११ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी कार्यकर्ते लागले कामाला , उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्याच्या पध्दतीने वाढली डोकेदुखी

उमेश पाटील-सांगली



११ गावांच्या निवडणूकांसाठी त्या त्या गावातील कार्यकर्ते पॅनल तयार करण्यासाठी कामाला लागले असून , उमेदवारी अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरण्याच्या प्रक्रियेने उमेदवारांची नव्हे तर त्यांच्या पॅनल प्रमुखांची डोकेदुखी वाढली असून , उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत पॅनल प्रमुखांना रात्रीचा दिवस करावा लागणार आहे . 

१५ जानेवारी ला अकरा गावातील ८९ जागांसाठी निवडणूक होणार असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अंतिम दिवस जवळ आले आहेत , त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्या त्या गावातील पॅनल प्रमुख आणि दिग्गज कार्यकर्ते आपल्या पॅनल च्या उमेदवारांचा अर्ज बरोबर भरता यावा , तो चुकीचा होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे .


                  मोघमवाडी , नांगोळे , बनेवाडी , जांभूळवाडी , तिसंगी , चोरीची , इरळी , म्हैसाळ ( एम ) , निमज , रायवाडी आणि थबडेवाडी अशा ११ गावांमध्ये निवडणूका होत आहेत  . मोघमवाडी , बनेवाडी , चोरोची , इरळी , म्हैसाळ ( एम ) आणि रायवाडी या गावांवर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची सत्ता होती , आता सर्वच ग्रामपंचायतींवर प्रशासकीय कारभार सुरू आहे . नांगोळे , निमज , या गावांवर खा. संजयकाका पाटील गटाची सत्ता होती .  तर तिसंगी व थबडेवाडी या दोन गावांवरच आमदार सुमनताई पाटील यांच्या गटाची सत्ता होती .

            जिल्हा परीषदच्या आरोग्य आणि शिक्षण समितीच्या सभापती आशाताई पाटील यांच्या म्हैसाळ गावात , बाजार समितीचे माजी संचालक दादासाहेब कोळेकर यांच्या नांगोळे येथे , महांकाली साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र पाटील यांच्या इरळी गावात , जि. प. चे माजी स्वीकृत सदस्य राजाराम पाटील यांच्या चोरोची येथील निवडणुका होत आहेत . या दिग्गज कार्यकर्त्यांच्या गावाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे . 


                   राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे घटक असलेले आमदार सुमनताई पाटील , माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे , काँग्रेस हे एकत्रित येऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविण्याची सुतराम शक्यता दिसत नाही . काही गावात घोरपडे विरुद्ध आमदार पाटील , काही गावात खासदार संजयकाका गटाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे चुरशीचे सामने होणार आहेत . तर खासदार संजयकाका गटाला थोपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घोरपडे गट एकत्रित येऊन लढत देण्याचे संकेत आहेत .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies