Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

एनयुजे महाराष्ट्रचे नेतृत्वाखाली माध्यमकर्मींचे आंदोलन!

 एनयुजे महाराष्ट्रचे नेतृत्वाखाली माध्यमकर्मींचे आंदोलन!

११डिसेंबर! चला मुंबईला!'

आवाज हक्काचा, ४थ्या स्तंभाच्या सन्मानाचा!

माध्यमकर्मींंना संपवणा-या काळ्या कामगार कायद्याचा निषेध !
आणि विविध मागण्यांचे पूर्ततेसाठी !



केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या 

कायद्यात पत्रकारांचे विशेषाधिकार काढले.

वेजबोर्ड बनविणेचा अधिकार संपवला,माध्यमकर्मींना कधीही कामावरुन काढण्याचा अधिकार मालकांना दिला.

या कळ्या,कायद्याविरोधात दि ११डिसेबर २०२०रोजी मुंबईत एनयुजे महाराष्ट्र करणार आहे, आक्रोश आंदोलन!  

आमच्या मागण्या सातत्याने आम्ही  सरकारला देतोय,पण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे दुर्लक्ष केले जातेय!

या जीवघेण्या मुस्कटदाबी विरोधात राज्यभरातील पत्रकार त्रस्त आहेत ! त्यांच्या हक्कासाठी नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रने आंदोलनाची हाक दिलीय.

मोठ्या संख्येने माध्यमकर्मींं या आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास नुकत्याच झालेल्या   अधिवेशनात सहभागी पत्रकारांनी व्यक्त केला.


माध्यमकर्मीं विकास महामंडळ,

त्रिपक्षीय समिती गठण , 

पत्रकारांची सामुहिक आरोग्य विमा योजना,

 मागील सरकारने घाईत केलेले निर्णय व जीआर यात सुधारणा करून सर्वसमावेशक धोरण ठरवणे,


अधिस्वीकृती व इतर पत्रकार हिताच्या समित्यांची व्यापकता *वाढवणे आणि पुनर्गठण करणे अत्यावश्यक आहे. हे माध्यकर्मींच्या सुरक्षित जगण्यासाठी अत्यावश्यक आहे.

या मागण्यांचे निवेदने  विकास आघाडीचे मार्गदर्शक

मग. खा शरद पवारसाहेब मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी,मा उपमुख्यमंत्रीअजित पवारजी,मा कामगारमंत्री दिलीप वळसेपाटीलजी ,विधान परिषद उपसभापती डाँ नीलमताई गोऱ्हे तसेच अनेक मंत्री व पालक मंत्री यांना निवेदने दिली गेली व दिली जाताहेत,मात्र सरकार सकारात्मक असुनही कोणतीही विधायक कृती दिसून येत नाही.

दोन्ही कडून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी होतेय.

आणि 

या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी!

आणि केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात आक्रोश आंदोलन मुंबईत घेण्याचे दि ५डिसेंबर रोजी एनयुजे महाराष्ट्रच्या झालेल्या राज्यस्तरीय वेब अधिवेशनात निश्चित करण्यात आले.

पत्रकारांवरील या अन्याय व गळचेपीविरोधात  रस्त्यावर उतरणे सत्ताधाऱ्यांनी भाग पडले आहे  असे स्पष्ट मत सर्वानी व्यक्त केले.

या बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

एनयुजे महाराष्ट्रचे  प्रमुख संस्थापक शिवेंद्रकुमार यांनी देशभरातील आंदोलनाविषयी माहिती दिली व आंदोलन विषयावर मार्गदर्शन केले.

एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर याचे नेतृत्वाखाली खाली झालेल्या या अधिवेशनात कोषाध्यक्ष वैशाली आहेर,प्रवक्ते संदिप टक्के,सचिव महेंद्र जगताप,ठाणेचे अध्यक्ष योगेश गोडे,सचिव,आनंद पद्मनाभन,उपाध्यक्ष प्रविण वाघमारें,तुषार गोसावी,स्वप्निल शिंदे,,पुणेजिल्हा कार्याध्यक्ष रायचंद शिंदे व जितेंद्र जाधव,रोहिदास गाडगे,सचिन ढेरे , रायगडचे सचिव प्रशांत हिंगणे, नवी मुंबई उपाध्यक्ष सुनिल कटेकर, औरंगाबादचे अध्यक्ष डाँ अब्दुल कादीर,कोषाध्यक्ष नलावडे, धनंजय ब्रम्हपुरकर ,रियाज देशमुख ,जळगाव सचिव संदिप पाटील,उमेश धनराळे  ,रत्नागिरीचे अध्यक्ष प्रकाश वराडकर,कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत घोणसे पाटील , सिंधुदुर्गचे अध्यक्ष आढाव 

,कोल्हापुरचे अध्यक्ष डाँ सुभाष सामंत,सचिव धोंगडे,कोषाध्यक्षभूपेश कुंभार,उपाध्यक्ष विश्वास दिवे ,सांगली अध्यक्ष लक्ष्मण खटके ,सोलापुरचे राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान परळीकर,साताराचे कार्याध्यक्ष डाँ विनोद खाडे,कोषाध्यक्ष गणेश बोतलजी 

पालघरचे अध्यक्ष विजय देसाई धनाजी घरत,नंदुरबारचे जितेंद्रसिह राजपूत,जालनाचे विष्णू कदम, भारत मानकर, आदि मान्यवरांनी विविध क्षेत्रातील माध्यमकर्मींंच्या अडचणी ,समस्या 

 आणि माध्यमांपुढीलआव्हाने 

 यावर आपली मते व्यक्त केली

अध्यक्ष शीतल करदेकर यांनी एनयुजे महाराष्ट्र करत असलेल्या मागण्यांबाबत अद्ययावत माहिती दिली ,

तसेच आंदोलनाची निकड व्यक्त करताना त्यांनी सांगितले की,

सर्व सामान्य जनता विविध क्षेत्रातील लोक आपल्या हक्कासाठी व अन्यायाविरुद्ध आवाज उडवतात,मग जे जनतेचा आवाज आहेत समाजाचा आरसा आहे अशा चौथ्या स्तंभाने मुस्कटदाबी का सहन करावी?कोरोना काळाचे निमित्ताने हजारोंच्या नोकर्‍या ,पगार छाटले गेले!

कोरोनाचे बाधित बळी पडले.

आणि त्यात याच कठीण काळात केंद्र सरकारने  नवा कामगार कायदा आणला,त्याद्वारे पत्रकार व सर्व माध्यमक्षेत्रातील माध्यमकर्मीना संपवण्याचे निश्चित केले आहे.या जीवघेण्या कायद्याच्या विरोधात संताप व्यक्त करणे आणि त्यात तातडीने सुधारण   अत्यावश्यक आहेत.

तसेच महाराष्ट्र सरकारलाही हा कायदा लागू करु नये म्हणून व इतर माध्यमकर्मींसाठी सर्वसमावेशक मागण्यांचे निवेदन दिले आहे.मात्र सरकार दरबारी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दुर्लक्षित केले जात आहे.हे सकस

लोकशाहीसाठी घातक आहे. असे अध्यक्षीय भाषणात सांगितले!

या अधिवेशनात माध्यमकर्मींंचा आवाज आक्रोश आंदोलनाद्वारे दि ११डिसेंबर २०२०रोजी मुंबईत   व्यक्त करण्याचे ठरले!

राज्यभरातून शंभरहून अधिक पत्रकार यात सहभागी झाले होते

एनयुजे महाराष्ट्र सरचिटणीस सीमा भोईर यांनी प्रास्ताविक ,तर कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी आभार मानले तर आँनलाईनअधिवेशनाचे  सूत्रसंचालन कैलास उदमलेंशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies