वासुंबे ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी विजय माने यांची एक मताने निवड: सरस्वती नगर येथे गुलालाची उधळण - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

वासुंबे ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी विजय माने यांची एक मताने निवड: सरस्वती नगर येथे गुलालाची उधळण

 वासुंबे ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी विजय माने यांची एक मताने निवड: सरस्वती नगर येथे गुलालाची उधळण

राजू थोरात-तासगांव


वासुंबे ग्रामपंचायतही तासगाव शहरालगत असल्यामुळे कायम चर्चेत असणारी ग्रामपंचायत आहे
ग्रामपंचायती हद्दीमध्ये वार्ड क्रमांक 3 मध्ये कायम अन्याय होत असल्याची तक्रार कार्यकर्त्यांची होती." कित्येक वर्षे वार्ड न 3 मधील सरपंच व उपसरपंच हे पद मिळाले नाही. ही नाराजी सरस्वती नगर मध्ये होतीच हे लक्षात घेऊन खासदार संजय काका पाटील यांच्या पाठिंब्याने ही संधी पहिल्यांदाच सरस्वती नगर भागाला मिळाली आहे. सरस्वतीनगर भागाला विजय माने यांच्या रूपाने उपसरपंचपद मिळाल्याने सर्व स्थरातून सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी वासुंबे गावचे भाजपचे नेते  संभाजी काकर, प्रशांत आबा पाटील, संजय लुगडे तसेच सरपंच छायाताई थोरात, मावळते उपसरपंच नानासो देवकाते व ग्रामसेवक चव्हाण  तसेच ग्रामपंचायत सदस्य  बाळासाहेब शेळके, बाळासाहेब एडके, पोपट चव्हाण, राजू शिंदे, शोभा पाटील, खराडे, एडके  तसेच युवा नेते शितल हाक्के, व रहिवाशी संतोष कोळेकर, नितीन एडके, सुशांत शेळके, कर्मचारी प्रदीप वाघमोडे, रमेश वाघमोडे, चेतन एडके, सुनीता जाधव, बजरंग शिंदे, उपस्थित होते सर्वानी नूतन उपसरपंच विजय माने यांचा सत्कार केला


No comments:

Post a Comment