तासगांव तालुक्यातील येळावीच्या डॉ प्रतीक्षा भंडारे यांचा पीएचडी मिळवल्याबद्दल सत्कार संपन्न - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, December 20, 2020

तासगांव तालुक्यातील येळावीच्या डॉ प्रतीक्षा भंडारे यांचा पीएचडी मिळवल्याबद्दल सत्कार संपन्न

 तासगांव तालुक्यातील येळावीच्या डॉ प्रतीक्षा भंडारे यांचा पीएचडी मिळवल्याबद्दल सत्कार संपन्न

राजू थोरात-तासगाव येळावी येथील कुमारी  प्रतीक्षा सुरेश भंडारे यांनी शिवाजी विद्यापीठात  प्राणिशास्त्र विषयावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी घेतली, नुकताच त्यांचा माजी सैनिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि प सदस्य संजय पाटील, सैनिक संघ फेडरेशन अध्यक्ष विजय पाटील, निवृत्त ब्रिगेडियर कॅप्टन संपत पाटील, जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे, निवृत्त सुभेदार सुरेश माने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष दिलिप जाधव होते. 

यावेळी अत्यंत गरिबीच्या कौटुंबिक परिस्थीवर मात करून, कठोर परिश्रम व अभ्यास करून येळावी गावाचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उज्वल करणाऱ्या कु.डॉ प्रतीक्षा भंडारे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी  जि प सदस्य संजय पाटील, सैनिक संघ फेडरेशन अध्यक्ष विजय पाटील, निवृत्त ब्रिगेडियर कॅप्टन संपत पाटील, जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे, निवृत्त सुभेदार सुरेश माने यांची भाषणे झाली.  कु.डॉ प्रतीक्षा भंडारे यांनी सत्काराला आभार व्यक्त करताना समाजातील मुलींना शिक्षणासाठी सर्वांनी प्रोत्साहन दिले पाहिजे तरच त्यांचे सक्षमीकरण होईल असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी स्वागत प्रास्तविक सुभेदार सुभाष पाटील, तर सूत्रसंचालन जालिंदर माने यांनी केले. माजी सैनिक संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील, माजी सैनिक सावंत भंडारे, सचिव वसंतराव माने, बाळासाहेब पाटील, सुरेश भंडारे, संजय पाटील  निशिकांत गंभीर, राजू सावंत, जगन्नाथ सुवासे, लक्ष्मी महिला बचत गटाच्या सर्व पदाधिकारी, विजय कांबळे आदी सह विविध संस्थांचे पदाधिकारी व महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment