कर्जतकरांचा पनवेल मुंबई प्रवास सुखाचा: जाचक टोल रद्द
शेडुंग येथील टोल दरामध्ये मिळाली मोठी सवलत
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत तालुक्यातील भाजपचे सुनील गोगटे यांनी कर्जत इथून जाताना लागणारा टोल मुक्त व्हावा यासाठी धरणे आंदोलनाचा इशारा तथा निवेदन दिले होते . त्यांच्या लढ्यास यश प्राप्त झाले असून कर्जत पनवेल येथे लागणारा शेडुंग टोल नाका काहीअंशी करमुक्त झाला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने 10 डिसेंबर रोजी आय आर बी प्रशासनास निवेदन वजा इशारा शेडुंग टोल नाका विषय दिला होता. या रस्त्याने पनवेल अथवा मुंबई इथे जाणाऱ्या चाकरमानी व विद्यार्थ्यांना टोलवर आर्थिक भुर्दंड पडत होता. कर्जतकडून पनवेलकडे जाताना लागणाऱ्या या दोन टोलनाक्यांवर अक्षरशः वाहन चालकांची लुबाडणूक केली जाते. याविरोधात कर्जत भाजपचे सचिव सुनील गोगटे यांनी यांनी आ य आर बी प्रशासनास 10 डिसेंबर रोजी टोल मुक्त करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा निवेदन वजा इशारा दिला होता. या लढ्यास आता यश आले असून आय आर बी प्रशासनाकडून असं लिखित मिळाला आहे की कर्जत कडून जाणाऱ्या प्रवासी वाहनात एकतर्फी ₹10 तर लोकल वाहनांकडून मासिक तीनशे रुपये घेण्यात येतील. यामुळेच कर्जत कडून पनवेल जाणाऱ्या प्रवाशांमध्ये पैशाची काही रक्कम वाचल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे व त्यामुळे सर्वजण भारतीय जनता पक्षाचा कौतुक करत आहेत.