देशासाठी सीमेवर लढणं हेच खरं देशप्रेम आहे
निरंजन पाटील-कोल्हापूर
देशासाठी सीमेवर लढणं हेच खरं देशप्रेम आहे, देशावर प्रेम करणाऱ्या सैनिकांमुळेच देश सुरक्षित आहे,असे प्रतिपादन अजिमाजी सैनिक वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरचे मार्गदर्शक निवृत्त सुभेदार एन एन पाटील यांनी केलं ते लक्ष्य करिअर अकॅडमी खिंडी व्हरवडे येथे आयोजित शहीद सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
Vo - राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे इथल्या सैनिक भरतीपूर्वक प्रशिक्षण संस्था लक्ष्य करिअर अकॅडमीचा शहीद सन्मान सोहळा साजरा झाला
यावेळी निवृत्त सुभेदार एन एन पाटील यांनी भारताच्या संरक्षक दलाची माहिती देत,सैनिकांचा पराक्रम स्पष्ट केला,सीमेवर लढताना वीर मरण आल्याने सैनिक मरत नसून तो अमर होत असल्याचं त्यांनी सांगितले,निवृत्त सुभेदार बी जी पाटील यांनी अल्पावधीत पाचशेहून अधिक सैनिक घडवनारी लक्ष्य अकॅडमी ही देशभक्त निर्माण करणारे विध्यापिठ असल्याचं सांगितलं, लक्ष्यचे संस्थापक लक्ष्मीकांत हंडे यांनी शहीद जवान आणि कुटूंबियांच्या बलिदानाचा गौरव करत सैनिकी क्षेत्रात जबाज काम करणाऱ्या सैनिकाला लक्ष्यच्या पुढील प्रत्येक वर्धापनदिनात शहीद जवान संग्राम पाटील आणि शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या नावाचा पुरस्कारदेण्याचं जाहीर केलं
यावेळी विरपत्नी हेमलता संग्राम पाटील,विरपित शिवाजी पाटील,वीरमाता साऊताई पाटील,विरबंधु संदीप पाटील, विरपिता रामचंद्र जोंधळे,वीरमाता कविता जोंधळे,विरभगिनी कल्याणी जोंधळे यांच्यासह लक्ष्य अकॅडमीचे अध्यक्ष माजी सैनिक हृदयनाथ हंडे,उपाध्यक्षा विजयमाला हंडे,सल्लागार मेघराज हंडे,खजाणीस राजेंद्र भरमकर यांच्यासह माजी सैनिक, आणि लक्ष्यचे प्रशिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.