डोंगर सपाटीकरणात जिलेटीनचा स्फोट एक ठार तर तीन जण गंभीर जखमी
उमेश पाटील -सांगली
तासगव्मध्ये बस्तवडे येथे डोंगर सपाटीकरण सुरु असताना गाडीतील कंप्रेसर गरम होऊन एका सिलिंडारसह डिझेलच्या टाकीने पेट घेतला तिथे असणार्या जिलेटीनच्या कांड्याचा स्फोट होऊन प्रतिक मनमत स्वामी वय 22 हा कामगार जागीच ठार झाला तर तिघेजण गंभीर जखमी आहेत हा स्फोट आज सांयकाळी 5 वाजता झाला.
स्फोटाने 10 किलोमिटर चा परिसर हादरला. प्रतिकच्या मृत शरीराचे अवशेष सुमारे 100 फुटावर पडलेले दिसून आले.जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली.