ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंद केल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांची नाराजी
अमूलकुमार जैन-मुरुड
मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रात आसणारा ऐताहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी नाताळाच्या दिवशी व नववर्षाच्या स्वागत करण्या करिता लाखो पर्यटक महाराष्ट्राच्या विविध भागातुन मुरूड समुद्रकिनारी व राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याकरिता येत असल्याने येथील व्यावसायिकांना चांगला रोजगार मिळत असतो.या रोजगारातुन लाखो रूपायांची उलाढाल होत असते.परंतु करोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याने त्यात ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंद होत आसल्याने स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाताळ सण आणि नववर्ष स्वागताचा संभाव्य जल्लोष लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर जिल्हाधिकारी - निधी चौधरी यानी स्थानिक परिस्थितीनुसार रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हात क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी- निथी चौधरी यांनी घेतला आहे. तसेच करोना संबंधित नियमांचे उल्लघन करणाऱ्या हॉटेल, रेस्तराँ आणि रिसॉर्टवर कारवाई करण्यात येणार असल्याने व्यावसायिक धास्तावले आहेत.
कोरोनामुळे गेले आठ महिन्यापासुन सर्व आर्थिक व्यवहार बंद होते.आता काही व्यवसाय सुरू होतयं तर पुन्हा संचारबंदी करण्यात आली.या निर्णायामुळे लाखो रूपयांचे नुकसान होणार आहे.पुन्हा बेरोजगार आर्थिक संकटात सापडणार आहेत.
नववर्षाकरिता कसा रोजगार कसा वाढेल त्याकरिता काहीनी कर्ज काढलीत. पर्यटक कसा आपल्याकडे आकर्षक होईल त्याकरिता लाखो रूपये व्यवसायात गुंतवलेत ते आता व्यर्थ होवुन पुन्हा बेरोजगार कर्जबाजारी होणार असे येथील सर्व व्यावसायिकांनी मत व्यक्त केले