तासगांव नगरपालिकेकडून आता वाहतुकीविषयी कड़क पाउले उचलण्यात येणार - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, December 24, 2020

तासगांव नगरपालिकेकडून आता वाहतुकीविषयी कड़क पाउले उचलण्यात येणार

 तासगाव शहरात पार्किंगसाठी नगरपालिकेकडून सम- विषम नियमावली.नियम मोड़णाऱ्यावर होणार कार्यवाही

तासगांव नगरपालिकेकडून आता वाहतुकीविषयी कड़क पाउले उचलण्यात येणार

 मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली माहिती

राजू थोरात-तासगावशहरात वाहतुकीचां विषय ऐरणीवर आला होता. वाहतुकीविषयी आता नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील हे आक्रमक झाले आहेत. नगरपालिकेकडून नियमावली जाहीर केली आहे

तासगाव शहरात सोमवार दिनांक 28/12/2020 पासून पहिल्या टप्प्यात स्टँड चौक ते सिद्धेश्वर मंदीर चौकापर्यंत असलेल्या रस्त्यावर सम - विषम पार्किंग नियमावली लावण्यात येणार आहे. सम व विषम तारखेला रस्त्याच्या नमूद बाजूलाच वाहने पार्किंग करायची असून, याबाबत उल्लंघन झाल्यास पोलीसांच्या मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याठिकाणी येणाऱ्या लोकांनी आपली वाहने छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल मधील बेसमेंटमधील पार्किंगमध्ये लावावीत. या टापूतील सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर जास्तीत जास्त 2 फुट बाय 2 फुट इतक्याच आकाराचे स्टँड लावायचे असून या उपरोक्त कोणताही अडथळा असल्यास तो जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.  याबाबतची अंमलबजावणी तासगाव नगरपरिषद व तासगाव पोलीस यांच्यामार्फत संयुक्तपणे करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment