सांगली जिल्ह्यात युवा सेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू-युवा सेना जिल्हाध्यक्ष विनायक गोंदील- - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

सांगली जिल्ह्यात युवा सेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू-युवा सेना जिल्हाध्यक्ष विनायक गोंदील-

 सांगली जिल्ह्यात युवा सेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू-युवा सेना जिल्हा अधिकारी विनायक गोंदील-

सावळज मध्ये युवा सेना व शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू- युवा सेना तासगाव तालुकाप्रमुख नंदकुमार मड़ंले

राजू थोरात- तासगाव सावळज येथील वार्ड क्रमांक 6 मध्ये नंदू मंडले व कुमार मंडले यांचा अर्ज भरण्यासाठी सांगली जिल्ह्याचे युवा सेना प्रमुख विनायक गोंदील हे आले होते.

अर्ज भरल्यानंतर विनायक गोंदील प्रसारमाध्यमांशी बोलत होते की तासगावसह सांगली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. वरिष्ठ नेते  मार्गदर्शन करतील त्यानुसार त्यांच्या खांद्याला खांदा लावून युवा सेना काम करेल.व जास्तीत जास्त उमेदवार शिवसेना व युवासेनेचे निवडून आनु.

त्यानंतर तासगाव तालुका युवा सेनेचे प्रमुख नंदू मंडले प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले तासगाव तालुक्यातींल 39 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून युवासेना काम करेल. मी नंदू मंडले व व कुमार मंड़ले यांनी सावळज मधून युवा सेनेकड़ूंन अर्ज भरला आहे. व सावळज ग्रामपंचायत पूर्ण ताकदिने युवा सेना व शिवसेना लढविणार आहोत .

यावेळी युवा सेनेचे विसापूर सर्कल  तालुका प्रमुख धनंजय मैदानकर, युवासेना तासगाव शहर प्रमुख हर्ष माळी, पलूस तालुका युवा सेना प्रमुख युवराज गोंदील, पलुस तालुका उपप्रमुख श्रीरंग सांडगे आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment