Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नाटोशीमध्ये राबवला जातोय पाटण तालुक्यात आदर्श ठरणारा अनोखा उपक्रम

 नाटोशीमध्ये राबवला जातोय पाटण तालुक्यात आदर्श ठरणारा अनोखा उपक्रम 

हेमंत पाटील-पाटण



नाटोशी मधील  कै_सोनाबाई_शंकर_टोळे यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले, त्यांची आज मातीक्रिया संपन्न झाली. त्यानिमित्ताने मोहन शंकर जाधव यांच्या संकलपणेतून त्यांच्या मुलाने व कुटुंबीयांनी सामाजिक_उपक्रम राबवला तो म्हणजे त्यांची अस्थी व रक्षा ओढ्यात, नदीत विसर्जन करून पाणी प्रदूषण न करता त्यांच्या स्मरणार्थ आंब्याचे_रोप लावून त्याच्या मुळाशी ती अस्थी व रक्षा विसर्जन करून त्या रोपाला त्यांच्या नावाने ओळख देऊन त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी व येणाऱ्या पिढी साठी एक चांगला वैचारिक आणि पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे त्याकुटुंबाने घेतली व हा त्यांचा उपक्रम संपूर्ण पाटण तालुक्याला आदेश ठरत आहे.

आमच्या संकल्पनेचे टोळे कुटुंबाने स्वागत करून रक्षा ही शास्त्र म्हूणून फक्त चिमूटभर फक्त पाण्यात विसर्जन विधी केला व वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.

आणि

आपल्या गावात प्रत्येकाने हा उपक्रम राबवावा यासाठी ग्रामपंचायत नाटोशी यांच्याकडून सहकार्य व मोफत झाड दिले जाईल, असे उदय देसाई यांनी सांगितले.


या उपक्रमाचा हेतू:

1) पाण्याचे प्रदूषण होणार नाही.
2) या रूपाने एक झाड लावले जाते.
3) ही रक्षा झाड किंवा आपल्या शेतात टाकली तरी सध्या आपण एक प्रकारे पर्यावरण रक्षण च करतोय.
4)या झाडाच्या रूपाने हे झाडं कुटुंबातील लोकांना नेहमी मार्गदर्शन करणार आहे या कुटुंबातील लोकाच्या बरोबर देखील समाजाला देखील त्याचे स्मरण राहणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies