सांगलीच्या विट्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून रेशन घोटाळयाचा पर्दाफाश; गहू, तांदळाची 319 पोती जप्त - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, January 15, 2021

सांगलीच्या विट्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून रेशन घोटाळयाचा पर्दाफाश; गहू, तांदळाची 319 पोती जप्त

सांगलीच्या विट्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून रेशन घोटाळयाचा पर्दाफाश; गहू, तांदळाची 319 पोती जप्त

गोडाऊनमध्ये 221 तांदळाची आणि 98 गव्हाची पोती असे एकूण 319 पोती धान्य सापडले. सापडलेल्या या धान्याचा करण्यात आला पंचनामा

उमेश पाटील -सांगलीसांगली : सांगली जिल्ह्यातील विटामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरु असलेला रेशनधान्याचा घोटाळा उघडकीस आणला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खानापूर तालुका अध्यक्ष साजिद आगा यांनी हा रेशनधान्याचा घोटाळा उघडकीस आणला. पुरवठा विभागाने एका पोल्ट्रीच्या गोडाऊनमध्ये टाकलेल्या छाप्यात 221 तांदळाची पोती तर 98 गव्हाची पोती असे एकूण असे एकूण 319 पोती धान्य सापडले. छाप्यात सापडलेल्या या धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे.

खानापूर तालुक्यातील गोरगरिबांच्या हक्काचे धान्य विटा येथील कराड रोडवर गोकुळ मंगल कार्यालयाजवळ असलेल्या एका पोल्ट्रीमध्ये रेशनधान्य असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खानापूर तालुकाध्यक्ष साजिद आगा व सचिव कृष्णा देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार मनसेचे तालुकाध्यक्ष साजिद आगा यांनी नायब तहसीलदार व धान्य पुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

No comments:

Post a Comment