Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 54 गावातील 204 सदस्यांनी घेतली राज्यमंत्री शंभूराजे देसाईंची भेट

 ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 54 गावातील 204 सदस्यांनी घेतली राज्यमंत्री शंभूराजे देसाईंची भेट 

कुलदीप मोहिते-कराडदौलतनगर दि.11-  पाटण विधानसभा मतदारसंघात 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत.पहिल्या टप्प्यात 36 ग्रामपंचायतीच्या निवडणूका या पुर्णत: बिनविरोध झाल्या तर 50 ग्रामपंचायती या अंशत: बिनविरोध झाल्या. 33 गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये सरळ निवडणूकीची लढत होत असून पुर्णत: व अंशत: बिनविरोध झालेल्या एकूण 86 ग्रामपंचायतीमध्ये 393  सदस्यांपैकी 256 सदस्य हे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे व शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानणारे आहेत. गेले दोन दिवस गृहराज्यमंत्री हे पाटण मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना मतदारसंघातील 54 ग्रामपंचायतीमधील शिवसेना पक्षाच्या एकूण 204 सदस्यांनी ना.शंभूराज देसाईंची दौलतनगर येथे भेटण्याकरीता तोबा गर्दी केली होती. उर्वरीत 18 ग्रामपंचायतीमधील 52 बिनविरोध सदस्य हे येत्या दोन दिवसात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची भेट घेणार आहेत.


            सातारा जिल्हयात सर्वात जास्त गा्रमपंचायतीच्या निवडणूका पाटण विधानसभा मतदारसंघात होत असून यातील पाटण तालुक्यात 107 व मतदारसंघातील सुपने-तांबवे पंचायत समिती गणामध्ये 12 अशा एकूण 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. पाटण मतदारसंघाचे आमदार आणि  राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे राज्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करीत आहेत त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकांकडे संपुर्ण सातारा जिल्हयाचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे व शिवसेना पक्षाचे पारडे जड असून पाटण मतदारसंघात अर्ज माघार घेणेदिवशीच 36 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत यामध्ये 21 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पक्षाचे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे वर्चस्व आहे.अंशत: बिनविरोध झालेल्या 50 ग्रामपंचायतीमध्ये 12 ठिकाणी शिवसेना पक्षाचे व ना.शंभूराज देसाईंचे बहूमत असून 38 ग्रामपंचायतीमध्ये सरळ लढत होत आहे. तर अनेक ग्रामपंचायतीमध्ये समसमातंर सदस्य हे बिनविरोध झाले आहेत.बिनविरोध झालेल्या 36 ग्रामपंचायती मधील 21 ग्रामपंचायतीच्या एकूण 130 व अशंत: बिनविरोध झालेल्या 74 अशा एकूण 204 बिनविरोध सदस्यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची येवून प्रत्यक्ष भेट घेतली.उर्वरीत 18 ग्रामपंचायती मधील 52 बिनविरोध सदस्यांनी शिवसेना पक्षाचे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे नेतृत्व मान्य करीत येत्या दोन दिवसात ना.शंभूराज देसाई पाटणच्या दौऱ्यावर येणार आहेत तेव्हा प्रत्यक्ष येवून भेट घेणार असल्याचे या ग्रामपंचायतींनी कळविले आहे.


          सद्यस्थितीला पाटण मतदारसंघात होणाऱ्या 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायतीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे व शिवसेना पक्षाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.भेटीला आलेल्या 204 बिनविरोध सदस्यांचा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी श्रीफळ देवून दौलतनगर येथे सत्कार केला. निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये बारकाईने लक्ष घालून जास्तीत जास्त सदस्य हे शिवसेना पक्षाचे करण्याचे आवाहन ना.शंभूराज देसाईंनी यावेळी उपस्थित सदस्य तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासमोर केले व भविष्यात या ग्रामपंचायतीमध्ये कशाप्रकारे चांगले काम करायचे याचे प्रशिक्षण निवडणूका झालेनंतर ग्रामपंचायत सदस्यांना तज्ञांकडून आयोजीत करणार असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी मी राज्याचा मंत्री म्हणून कुठेही कमी पडणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख ना.उध्दवजी ठाकरे यांनी राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझेवर मोठी जबाबदारी दिली आहे. जनतेच्या आर्शिवादानेच हे सर्व शक्य झाले असून राज्याचा मंत्री असलो तरी  “ घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी ” या म्हणीप्रमाणे माझे लक्ष पाटण मतदारसंघातील जनतेवर आहे येथील विकासकामांवर आहे. सन 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कार्यकालात आमदार असताना मतदारसंघातील प्रत्येक गांवामध्ये आवश्यक ती समाजपयोगी विकासकामे आपण मार्गी लावली आहेत. भविष्यात या गांवातील उर्वरीत राहिलेल्या विकासकामांचा ग्रामस्थांच्या आणि सदस्यांच्या मागणीनुसार आराखडा तयार करुन ही विकासकांमे मार्गी लावण्याकरीता प्रयत्नशील असल्याचे सांगत ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध झालेल्या सदस्यांचे गृहराज्यमंत्री यांनी अभिनंदन करीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी होण्याकरीता  त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies