कर्जत तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
कर्जत तालुक्यातील एकूण 54 ग्रामपंचायतीचे आरक्षण नुकतेच पंचायत समितीच्या वरच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झाले असून यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार सोपान बाचकर,पुरूषोत्तम थोरात, सुधाकर राठोड, जिल्हा परिषदचे माजी सभापती अशोक भोपतराव,माजी सभापती प्रदीप ठाकरे सहायक बिडीओ रजपूत ,आदी यावेळी उपस्थित होते.
@अनुसूचित जातीच्या रजपे आणि बीड बुद्रुक या दोन ग्रामपंचायत पैकी रजपे ही ग्रामपंचायत ही महिलेसाठी आरक्षित झाली आहे.
@अनुसूचित जमातीच्या 16 ग्रामपंचायत पैकी 8 ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत त्यातील अंभेरपाडा,पाली, जिते,जांबरुक,गौरकामथ, मोग्रज,भिवपुरी, ओलमन आदी ग्रामपंचायत या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
@नागरिकांचा मागास प्रवर्गच्या एकूण 15 ग्रामपंचायत पैकी 8 ग्रामपंचायत या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यातील पोटल,नसरापूर, शेलू, तिवरे,वेणगांव,दहिवली तर्फे वरेडी,ममदापूर,आणि चिंचवली या आठ ग्रामपंचायत महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
@सर्वसाधारण गटासाठी 21 ग्रामपंचायत पैकी 11 ग्रामपंचायत या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत त्यातील वैजनाथ ,नेरळ,वदप,पाषाणे, मांडवणे,वारे,पोशिर,उकरूळ,साळोख तर्फे वरेडी,बोरीवली,पिंपलोली या ग्रामपंचायत महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.