कर्जतमध्ये 78 वा बलिदान दिन साजरा
नरेश कोळंबे-कर्जत
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 2 जानेवारी 1942 रोजी सिद्धगड येथे शहीद झालेल्या हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या शौर्याचा स्मृतिदिन क्रांतिकारी स्मृती समिती कर्जत रायगड यांच्याद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाची सुरुवात माजी सैनिक डि एम धुळे यांनी तसेच नाभिक समाज कर्जत तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे, पत्रकार विजय मांडे, माजी सैनिक प्रमोद लोभी यांच्या हस्तेक्रांती ज्योत पेटवून केली गेली. तसेच डॉ. रमेश पोवार व डॉ नितीन भोपत राव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. भगवान धुळे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धगडावरील आणलेल्या मृतिकेच पूजन माजी विस्तराधिकारी जी. एस म्हात्रे सर व केंद्रप्रमुख राजेंद्र आढाव सर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ शेळके यांनी केले
तर हुतात्म्यां चा ज्वलंत इतिहास इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे यांनी सर्वांसमोर मांडला. या कार्यक्रमाला कर्जत माजी नगराध्यक्ष राजेश लाड , रविंद्र सोनावणे,जगदीश ऐनकर, मारुती हजारे, श्रीकांत आगीवले , बळीराम ऐन कर, रोहिदास लोभी, राकेश डगले, विशाल विभार, विशाल कोकरे, अतुल पवार ,सतीश शेळके, देविदास कोळंबे ई मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांत बीड बुद्रुक येथील तरुण मंगेश रुठे यांच्या नेतृत्वाखाली मशाल घेऊन सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय कोंडीलकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रघुनाथ विभार यांनी केले.