हुतात्मा भाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी
हुतात्मा भाई कोतवाल यांच्या घराचे स्मारक कधी होणार हा प्रश्न अधांतरीच ?
चंद्रकांत सुतार- माथेरान
क्रांतिवीर हुतात्मा भाई कोतवाल यांची ७८ वी पुण्यतिथी सकाळी ५-३० वाजता नौरोजी उद्यानातून मशाल फेरी काडून सुरवात करण्यात आली, यावेळी मा. नगराध्यक्षा सौ प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते पुण्यज्योत प्रज्वलित करून हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहारअर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यातआली.यावेळी उपस्थित नगरसेवक नगर सेविका सन्माननीय नागरिकांनी भाईं कोतवालाना पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर स्वातंत्र सैनिकांच्या स्तंभास नगरसेविका सौ सुषमा कुलदीप जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांचा शिल्पास आणि प्रतिमेस, नाम फलकास अनुक्रमे नगरसेविका प्रतिभा घावरे व उपनगराध्यक्ष आकाश चौधरी ,नगरसेविका नजमा नासीर शारवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, आजच्या हुतात्मा भाई कोतवाल याच्या पुण्यस्मरण कार्यक्रम वेळी प्रकर्षणे जाणवते ते भाईनचे घर
हुतात्मा भाई कोतवाल यांचे माथेरान येथे फार जुने घर आहे हुतात्मा भाई कोतवाल यांचे वारसदार त्या जुन्या घरात आपले जीवन व्यथित करीत आहेत स्वातंत्र्य सैनिकांना शासन पाच एकर जागा देते परंतु भाई कोतवाल यांच्या जुन्या आठवणीना , भाईचा आदर्श डोळ्यासमोर राहण्यासाठी यांना भव्य स्मारक उभारून शासनाने त्या चिरंतर वास्तूला स्मारक घोषित करावे.हुतात्मा भाई कोतवाल यांची जयंती आणि पुण्यतिथी आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी भाई कोतवाल यांच्या नावाचा जयजयकार होत असतो माधवजी गार्डनमध्ये भाईंच्या अर्ध पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करतात त्यावेळी गावातील ठराविकच मोजकीच मंडळी व शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित असतात वर्षातून केवळ चार वेळाच हुतात्मा भाई कोतवाल यांची आठवण करत असतात जयंती पुण्यतिथी झाले का त्या दिवसापुरता फक्त भाई कोतवाल यांचा जयजयकार असतो नंतर मात्र विसर पडलेला असतो यासाठीच हुतात्मा भाई कोतवाल यांची यशोगाथा अजरामर राहण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक लवकरात लवकर शासनाने उभारावे यासाठी मागील अनेक वर्ष होऊन गेलीत तरी अजून हुतात्मा भाई कोतवाल यांच्या राहत्या घराची अवस्था बिकट आहे , शासन,विध्यमान प्रशासनाने याबाबत पुढाकार घेतला आहेच परंतु नक्की अडचण कुठे येते भाई राहत्या घराचे एक सुंदर स्मारक व्हावे यासाठी त्यांच्या कुटुंबामध्ये काही प्रॉब्लेम चा वाद-विवाद आहेत का ,याची शहानिशा त्याच्याशी चर्चा करून लवकरात लवकर भाई कोतवाल यांचे घर एक सुंदर स्मारक संग्रहालय करावे. ही अपेक्षा