भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान

 भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान 

नागोठणे विभागात महिलांचा भाजपकडे वाढता कल 

 राजेश भिसे- नागोठणेकोलाड येथील सरकारी विश्रांतीगृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश मोहिते ,तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड ,नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, उपाध्यक्ष गौतम जैन व जिल्हा महिला अध्यक्ष हेमा मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. नव्याने नियुक्त केलेल्या रोहे तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांना ना. दरेकर आणि आ. रविशेठ पाटील यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यात फातिमा सय्यद, माधुरी रावकर (रोहा तालुका उपाध्यक्ष), अपर्णा सुटे (रोहा तालुका महिला चिटणीस), श्रेया कुंटे (नागोठणे विभाग महिला आघाडी अध्यक्षा), रेखा मुंडे आणि शेहनाज कडवेकर (नागोठणे विभाग महिला आघाडी उपाध्यक्ष),.सोनाली पडवळे आणि  संज्योती लाड (नागोठणे शहर महिला आघाडी सरचिटणीस), शितल नांगरे,प्रियांका पिंपळे,मुग्धा गडकरी आणि स्वानंदी चितळकर(नागोठणे शहर महिला आघाडी उपाध्यक्ष) यांचा समावेश आहे. आमदार रवीशेठ पाटील यांच्या चांगल्या प्रतिमेमुळे विभागातील महिलांचा कल हा भाजपकडे आहे व व  बऱ्याच महिला या भाजप मध्ये प्रवेश करत आहेत.नागोठणे व  विभागात पक्षवाढीसाठी सरचिटणीस आनंद लाड व शहरअध्यक्ष सचिन मोदी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे असे श्रेया कुंटे यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment