Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

दिलेला शब्द पाळला असता तर युती राहिली असती फडणवीस यांच्यामुळेच युती तुटली : खा : विनायक राऊत

दिलेला शब्द पाळला असता तर युती  राहिली असती फडणवीस यांच्यामुळेच युती तुटली : खा : विनायक राऊत

जिल्हापरिषद,पंचायत समिती अध्यक्ष,सभापती निवडीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे राऊत यांनी दिले संकेत

ओंकार रेळेकर-चिपळूण



महाराष्ट्रात वर्षानुवर्षे असलेलली महायुती तोडण्यास माजी मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असल्याचा गौप्यस्फोट करून भाजपाने दिलेला शब्द पाळला असता तर युती टिकली असती असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले,जिल्हापरिषद ,पंचायत समितीच्या आगामी अध्यक्ष,सभापती पदाच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे राऊत यांनी या वेळी सांगितले,सोमवारी खा. विनायक राऊत चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक  निमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता तालुका दौऱ्यावर आले असता शासकीय विश्राम गृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या वेळी त्यानी भाजप नेते खा. नारायण राणे यांच्यावरही सडकून टीका केली ते म्हणाले सुरक्षा काढल्यामुळे आपल्या जीवितास धोका झाल्यास शासन जबादार असेल असे राणे म्हणत आहेत तर राणेंना दहशतवादयांपासून नव्हे तर स्वतःच्या मुलांपासूनच अधिक धोका असल्याने त्यांनी मुलांची काळजी घ्यावी असा टोला लगावला आहे,पक्षसंघटन अधिक बळकट होण्यासाठी आ.भास्कर जाधव यांची भेट घेणार असल्याचे राऊत यांनी या वेळी सांगितले,

नगरपालिका नवनिर्वाचीत  सभापतींचा सत्कार

चिपळूण नगर पालिकेत नुकत्याच झालेल्या सभापती निवडणुकीत सभापतीपदी विराजमान झालेले आरोग्य सभापती शशिकांत मोदी, बांधकाम सभापती मनोज शिंदे,महिला कल्याण सभापती सुमय्या फकीर यांचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण,जिल्हाप्रमुख सचिन कदम,चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम,तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे,चिपळूण तालुका समन्वयक राजू देवळेकर, महम्मद फकीर,नित्यानंद भागवत तसेच अनेक शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies