काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांनी समाधीस्थळी जाऊन स्व. गोविंदराव निकम यांना केले अभिवादन
ओंकार रेळेकर-चिपळूण
रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, शिक्षण महर्षी स्व .गोविंदरावजी निकम यांची आज जयंती. चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी सावर्डे येथे स्व. गोविंदरावजी निकम यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. स्व. गोविंदरावजी निकम त्यांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, त्यांचे शिक्षण, सहकार क्षेत्रातील योगदान मोठे आहे, अशी भावना प्रशांत यादव यांनी व्यक्त केली. या वेळी जिल्हा परिषेदेचे माजी सदस्य विजयराव देसाई, रफिक मोडक, दिलीप आंब्रे, रुपेश इंगावले उपस्थित होते.