मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबई बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रेलर पेटला असून यात ट्रेलरची केबिन जळून खाक झालीय.सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही.मुंबईहून हा ट्रक पुण्याच्या दिशेने जात असताना किलोमीटर 46 जवळपास बोरघाटात आला असता ट्रेलरच्या केबीनने पेट घेतला,या अपघातामुळे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसून वाहतूक सुरळीत सुरू आहे.
सकाळी 6 वाजल्यानंतरची ही घटना असून आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स आणि देवदूत यंत्रणेने या घटनेत तातडीने उपाय केल्याने जीवित हानी टळली असून त्याच सोबत इतर वाहनांना होणारा धोका टळलाआहे.