उदघाटनाचे प्रतिक्षेत असलेल्या म्हसळा पंचायत समितीच्या नुतन इमारत बांधकामाची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पहाणी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, January 17, 2021

उदघाटनाचे प्रतिक्षेत असलेल्या म्हसळा पंचायत समितीच्या नुतन इमारत बांधकामाची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पहाणी

 उदघाटनाचे प्रतिक्षेत असलेल्या म्हसळा पंचायत समितीच्या नुतन इमारत बांधकामाची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पहाणी

अरुण जंगम-म्हसळामहाराष्ट्र शासनाच्या पंचायतराज 31 सहाय्यक अनुदाने 25/15 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत 2014 मध्ये विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांचे विशेष प्रयत्नाने सुमारे 2 कोटी 47 लक्ष 55 हजार रुपयांचे प्रस्तावित कामाला प्रत्यक्ष 2 कोटी1लक्ष 70861रुपयांची प्रशाकीय मंजुरी मिळवुन दिली.मंजुर कामाचे बांधकाम पाच वर्षात पुर्ण झाले आसुन नुतन भव्यदिव्य म्हसळा पंचायत समितीच्या इमारत आता उदघाटनाचे प्रतिक्षेत आहे.दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी इमारतीचे उदघाटन करण्यापूर्वी शासकीय अधिकारी,तालुका लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि संबंधित एजन्सी यांचे उपस्थितीत पूर्णत्वास आलेल्या पंचायत समिती इमारतीच्या बांधकामाची पहाणी करून सविस्तरपणे माहिती घेतली.या वेळी पालकमंत्री महोदयांनी इमारत अधिक सुशोभित दिसण्यासाठी काही सुचना वजा आदेश दिले आणि संबंधिताना काही अपुर्ण  कामांची पुर्तता 23 जानेवारी 2021च्या आगोदरच  कराव्यात असे सांगितले.दिनांक 23 जानेवारी रोजी म्हसळा पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे खासदार सुनिल तटकरे यांचे मार्गदर्शनाखाली उदघाटन कार्यक्रम आयोजित केला जाईल असे संकेत देतानाच या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे माहितीअंती समजते.इमारत बांधकाम पहाणी दोऱ्यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिप सदस्या धनश्री पाटील,नगराध्यक्षा जयश्री कापरे,सुहेब

उपसभापती मधुकर गायकर,उपनगराध्यक्ष सुहेब हलदे,माजी सभापती छाया म्हात्रे,प.स.सदस्य संदीप चाचले, गटविकास अधिकारी प्रभे, सिडीपीओ तरवडे,रियाज घराडे,शाहिद उकये, सतीश शिगवण,महेश घोले,अनिल बसवत आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment