बुलेटवरील तिघांपैकी दोघां युवकांचा जागीच मृत्यू - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, January 16, 2021

बुलेटवरील तिघांपैकी दोघां युवकांचा जागीच मृत्यू

 बुलेटवरील तिघांपैकी दोघां युवकांचा जागीच मृत्यू

तासगाव - गोटेवाडी रस्त्यावर पुनदी फाटी जवळअपघात  

उमेश पाटील -सांगली


       तासगाव - गोटेवाडी रस्त्यावर पुनदी हद्दीत   ताकारी कॅनॉल च्या कठड्या जवळील सिमेंटच्या खांबाला धडक होऊन झालेल्याअपघात  बुलेट (MH10-06DN-4455)गटारात पडून तिघांपैकी  दोघां युवकांचा मृत्यू झाला आहे.

         मृतामध्ये तेजस महिपती नलवडे (वय 24) वर्षे व राहुल शामराव माळी (वय 26) वर्षे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय उत्तम माळी वय 26 वर्षे हा युवक जखमी असून याच्यावर तासगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रात्री 9:30 दरम्यान झाला . हा अपघात इतका भीषण होता की यातील दोघे मृत जागीच मृत झाले , अपघात स्थळापासून जवळ असलेल्या ऊस तोडणी कामगारांनी रस्त्यावरून येणाऱ्या गाड्या थांबवून अपघात ग्रस्तांना मदत करण्यासाठी थांबवले.यातील जखमी अजय माली याकडून हे अपघातग्रस्त पेडचे असल्याचे माहीत झाले त्यातील काहींनी पेडला संपर्क साधून माहिती दिली .पेडहुन काही युवक माहिती मिळताच तात्काळ अपघात स्थळावर आले. सदर अपघाताची माहिती तासगाव पोलिसांत देण्यात आली.तासगाव पोलीस ठाण्यातुन पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके सह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमी अजय माळी यांना उपचारासाठी तासगावला हलवले असून मृतांचा पंचनामा सुरू आहे. अपघात  स्थळी पेडमधून मोठया प्रमाणात गावकरी व नातेवाईकांची गर्दी झाली आहे. 

No comments:

Post a Comment