धनुष सानप इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमलामध्ये प्रशिक्षणासाठी दाखल - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, January 3, 2021

धनुष सानप इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमलामध्ये प्रशिक्षणासाठी दाखल

 धनुष सानप इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमलामध्ये प्रशिक्षणासाठी दाखल

अमूलकुमार जैन-मुरुड   रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचे पुत्र धनुष सानप हा वयाच्या सतराव्या वर्षी इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमला, जि.कन्नूर, राज्य-केरळ येथे चार वर्षाच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाला आहे.


   धनुष सानप याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सन 2019 मध्ये एनडीए / इंडियन नेव्हल अकॅडमी येथील प्रवेशाकरिता घेतलेल्या देशपातळीवरील स्पर्धा परीक्षेत 553 वा क्रमांक पटकावला आहे.आता तो इंडियन नेव्हल अकॅडमी, एझिमला, जि.कन्नूर, राज्य-केरळ येथे चार वर्षाच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाला आहे.

     धनुष सानप याला त्याचे आयुष्य हे देशसेवे साठी वाहून घेण्याची इच्छा होती.म्हणून त्याने देशसेवेचा आणि करिअरचाही एक उत्तम मार्ग म्हणून इंडियन नेव्हल अकॅडमीची निवड केली. त्यासाठी त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी 

खडतर प्रयत्न करीत सन 2019 मध्ये एनडीए / इंडियन नेव्हल अकॅडमी येथील प्रवेशाकरिता घेतलेल्या देशपातळीवरील स्पर्धा परीक्षेत 553 वा क्रमांक पटकावला आहे.

  केरळ राज्यातील एझिमला येथे चार वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर धनुष वयाच्या साडे एकविसाव्या वर्षी भारतीय नौसेनेमध्ये सब-लेफ्टनंट या अधिकारी पदावर रुजू होईल. 

     येथे प्रवेश मिळविताना त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची देशपातळीवरील लेखी स्पर्धा परीक्षा, एस.एस.बी मुलाखत  व सैन्यदलामध्ये आवश्यक असलेली वैद्यकीय चाचणी हे टप्पे पार पाडले.

     त्याच्या या यशामध्ये औरंगाबाद येथील "सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था" या शासकीय प्रशिक्षण संस्थेचा* सिंहाचा वाटा आहे.

     धनुषने त्याचे इयत्ता दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, ओएनजीसी,पनवेल येथून तर इयत्ता अकरावी आणि बारावीचे शिक्षण त्याने सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद येथून पूर्ण केले. धनुषला इ.दहावी मध्ये 93 टक्के तर इ.बारावी मध्ये 79 टक्के गुण मिळाले होते.

      गत वर्षीच धनुषची 17 वर्षांखालील वयाेगटातून राष्ट्रीय फुटबॉल संघात महाराष्ट्र राज्यातर्फे निवड झाली होती. धनुष फुटबॉलसह लॉन-टेनिस, बास्केटबॉल, टेबल टेनिस या खेळांमध्येही पारंगत असून त्यास इंग्रजी व जर्मन भाषेची त्याचबराेबर अभिनयाची विशेष आवड आहे.

      धनुषच्या यशात त्याच्या प्रामाणिक मेहनतीबरोबर कुटुंबातील प्रत्येक सदस्य यांचा मोलाचा वाटा आहे.त्याच्या या यशाबद्दल रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी,निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे आदीसहित अधिकारी कर्मचारी, यांनी त्याचे अभिनंदन करीत त्याला त्याच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.No comments:

Post a Comment