माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, January 3, 2021

माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे निधन

 काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, कराड दक्षिण चे सात वेळा आमदार, माजी सहकार,दुग्धविकास,पशुसंवर्धन,मदत व पुनर्वसन मंत्री विलासराव (काका) उंडाळकर यांचे दुःखद निधन झाले. मिलिंद लोहार/प्रतीक मिसाळ--सातारा :- राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि कराड दक्षिण मतदार संघाचे सलग 35 वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार विलासकाका पाटील - उंडाळकर यांचे उपचारादरम्यान वयाच्या 84 व्या वर्षी  सोमवारी पहाटे सातारा येथे निधन झाले. त्यांनी राज्याच्या  सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment