मुरबाडमध्ये स्वच्छतेची शपथ घेऊन नववर्षाचे स्वागत - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, January 2, 2021

मुरबाडमध्ये स्वच्छतेची शपथ घेऊन नववर्षाचे स्वागत

 मुरबाडमध्ये स्वच्छतेची शपथ घेऊन नववर्षाचे स्वागत

 सुधाकर वाघ-मुरबाडमुरबाड शहरात भाजपाच्या वतीने नववर्षाचे स्वागत रॅली काढून करण्यात आले. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. 

     मुरबाड नगरपंचायतीच्या वतीने काढण्यात आलेल्या स्वच्छता रॅलीत आमदार किसन कथोरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कंकाळ ,तालुका अध्यक्ष जयंत सुर्यराव, शहर अध्यक्ष सुधीर तेलवणे, जिल्हा सहचिटणीस नितीन महोपे, नगराध्यक्षा छाया चौधरी, महीला मोर्चा अध्यक्षा शितल तोंडलीकर उपनगराध्यक्षा अर्चना  विशे,नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी नगर पंचायतीने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेचे आमदार कथोरे यांनी  परीक्षण केले. शहरातील तिनहात नाका येथून रॅलीला सुरुवात झाली. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून शिवाजी महाराज चौकात रॅलीचे  विसर्जन करण्यात आले. शहरातील स्वच्छता व शहर स्वच्छ ठेवण्या साठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा व शहर स्वच्छ ठेवण्याची शपथ घ्यावी असे आवाहन कथोरे यांनी या वेळी केले. मुरबाड शहरातील न्यु इंग्लीश स्कूल मधील प्रांगणात स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

No comments:

Post a Comment