Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना विशेष सेवा पदक जाहीर

 

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना विशेष सेवा पदक जाहीर

              प्रतिक मिसाळ-सातारा

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्र शासनाचे असाधारण असुचना कुशलता पदक ( Intelligence Medal )तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक 'जाहिर

 अजय कुमार बंसल , भा.पो.से. पोलीस अधीक्षक , सातारा यांनी १३ ऑगस्ट २०१८ रोजी अपर पोलीस अधीक्षक अभियान , जि.गडचिरोली पदाचा कार्यभार स्वीकारला . कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दक्षिण गडचिरोली या दुर्गभ अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातील नागरीकांचा विश्वास संपादन करुन गोपनीय सुत्रांचे / खब - यांचे जाळे निर्माण केले . त्यांच्या या पुढाकारामुळे त्यांना संपुर्ण गडचिरोली तसेच छत्तीसगड व तेलंगना राज्याच्या सिमावर्ती भागातून देखील गोपनिय माहिती प्राप्त होण्यास सुरुवात झाली . त्यांनी गडचिरोली जिल्हयातील नक्षलवादयांचा गढ़ असलेल्या अबूझमाड जंगल भागात पोलीस खबरी यंत्रणा मजबुत करण्यासाठी महत्वाची कामगिरी केली . त्यांनी निर्माण केलेल्या बातमीदारांच्या जाळयामुळे सी -६० पथकांना गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम नक्षल संवेदनशिल भागात तसेच छत्तीसगड राज्याच्या सिमावर्ती भागात नक्षलविरोधी माहिमा यशस्वीरित्या राबवता आल्या . या सर्व बाबींचे सकारात्मक परिणाम दिसुन आले . म्हणुन त्यांच्या या कामाची दखल घेवुन केंद्र शासनाने त्यांना दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी केंद्रीय गृह विभागातर्फे ' असाधारण आसुचना कुशलता पदक ' ( Intelligence Medal ) जाहीर केले आहे . त्यांचेसह महाराष्ट्रा राज्याचे एकुण ७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर पदक जाहीर झाले आहे . तसेच त्यांनी गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात सलग २ वर्षे सेवा बजावुन केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष सेवा पदक ' जाहिर केले आहे . यापर्वी दिनांक १ मे २०२० रोजी त्यांना मा . पोलीस महासंचालक , म.रा.मुंबई यांचे पोलीस महासंचालक पदक ' ( DG Insignia ) देखील प्राप्त झालेले आहे . याशिवाय श्री तानाजी बरडे , उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांना त्यांनी ऑगस्ट २०१७ ते सन २०१ ९ पर्यंत गडचिरोली जिल्हयातील भामरागड सारख्या नक्षलग्रस्त भागात केलेल्या खडतर कामगिरीबददल त्यांना देखील मा.पोलीस महासंचालक , म.रा.मुंबई यांचे विशेष सेवा पदक ' जाहीर झाले आहे . त्यांचे गडचिरोली येथील कार्यकालात ७ नक्षलवादयांनी शरणागती पत्करली असुन लोकसभा निवडणूका- २०१ ९ शांततेत पार पाडण्यात त्यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies