मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कारला आग
महाराष्ट्र मिरर टीम-खोपोली
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर काल एका ट्रेलरला लागली होती त्यात ट्रेलरची केबीन जळून खाक झाली त्यानंतर रात्री आठ वाजल्याच्या दरम्यान किलोमीटर 17:900 वर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनला MH02 BJ 1010 SWIFT ही कार मुंबईहून पुण्याकडे जात असताना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने जळून खाक झाली. सुदैवाने त्यामध्ये कोणीही जखमी नाही.
आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि देवदूत यंत्रणेने ही आग आटोक्यात आणली असली तरी कार मात्र जळून खाक झाली आहे.
काल एक ट्रेलर आणि कार जळल्याच्या दोन घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वारंवार अशा घटना घडत असल्याने वाहनचालकामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे