ऑल इंडिया सिमेंस युनियनच्या उपाध्यक्षपदी कॅप्टन अंशु अभिषेक यांची नियुक्ती
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
ऑल इंडिया सिमेंस संघटनेच्या उपाध्यक्ष पदी कॅप्टन अंशु अभिषेक यांची नियुक्ती झाली असून त्यांची ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.कॅप्टन अंशु अभिषेक यांच्या या नियुक्तीने सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शिपिंग क्षेत्रातील कामगार ,कर्मचाऱ्यांशी सलोख्याचे आणि सौजन्याने वागून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असून संघटना व कामगार ,कर्मचारी यांमधील दुवा बनून संघटना वाढविण्याचे ध्येय उराशी असल्याची प्रतिक्रिया कॅप्टन अंशु अभिषेक यांनी महाराष्ट्र मिररशी बोलताना दिली.