विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यापासून दूर रहावे - पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, January 8, 2021

विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यापासून दूर रहावे - पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख

 विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यापासून दूर रहावे - पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख

राजू थोरात-तासगाव सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या विळख्यातून बाहेर पडावे आणि स्वतःला सायबर गुन्ह्यापासून दूर ठेवावे असे उद्गार पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे आयोजित  कार्यक्रमात बोलताना काढले दोन जानेवारी पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस-जनता संवाद कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात केले होते . त्यांनी विद्यार्थ्यांना गुन्ह्यांपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केले. कायद्याची ओळख करून दिली. हेल्मेट वापरणे गरजेचे आहे हे सांगून सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हे घडतात त्यापासून आपला बचाव करावा याविषयी मार्गदर्शन केले. सैराट होऊन न जाता करियर कडे लक्ष द्यावे. जीवन अमूल्य आहे त्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.


यावेळी पोलीस निरीक्षक सतिश शिंदे  म्हणाले ,जगात अशक्य असे काहीच नसते. स्पर्धा परीक्षेचे स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगुन हार्डवर्क केले म्हणजे यश नक्कीच मिळते हा विश्वास दिला. विजेते कधीच कारणं सांगत नसतात हे सांगून जनसामान्यांचे अश्रू पुसण्याचे भाग्य पोलिसांना लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.      

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभागप्रमुख प्रा.आर.डब्ल्यू.रोमन यांनी केले. तर आभार प्रा.व्ही. एच.पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला कला वाणिज्य प्रमुख प्रा.ए.बी. कांबळे प्रा.रोहन पाटील, दिलीप सुवासे ,महादेव सपकाळ , वसंत कोळी व अकरावी विज्ञान विभागातील विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment