वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती 'महिला शिक्षण दिन ' साजरा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, January 3, 2021

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती 'महिला शिक्षण दिन ' साजरा

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती 'महिला शिक्षण दिन ' साजरा

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले -प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

राजू थोरात- तासगाव  शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याविण्यात फुले दाम्पत्यांचे योगदान मोठे असून जात ,पात विसरून  मुलींना ,महिलांना ,विधवांना शिक्षणाचे द्वार खुले करून ज्ञानी करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले ते पुढे म्हणाले ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडणं अवघड होतं त्या काळात सावित्रीबाईंनी स्त्री-पुरुष समानतेचा हक्क मिळावा यासाठी आग्रही भूमिका मांडली. मुलींना शिकविण्यासाठी शाळेत जात असताना प्रसंगी प्रसंगी समाजकंटकांकडून दगड , चिखल आणि शेणाचे गोळे झेलले .जोतीरावांच्या सत्य ,समता आणि मानवतावादी तत्त्वांचा सावित्रीबाईंनी हयातभर पाठपुरावा केला.महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे . त्याचबरोबर 'आम्ही सावित्रीच्या लेकी ' या विषयावर वेबिनार चे आयोजन केले आहे.

        कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत केंद्रसंयोजक प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले. तर आभार डॉ.हाजी नदाफ यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन वाघमारे यांनी केले .कार्यक्रमाला श्री. जगदीश सावंत व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

No comments:

Post a Comment