नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तर मधील विरवडे ग्रामपंचायत बिनविरोध - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, January 3, 2021

नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तर मधील विरवडे ग्रामपंचायत बिनविरोध

 नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तर मधील विरवडे ग्रामपंचायत बिनविरोध

          शुभवार्ता

            कुलदीप मोहिते कराडकराड उत्तर मतदार संघातील मौजे विरवडे ता.कराड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. 

कराड उत्तर मतदार संघातील विरवडे ता.कराड जि. सातारा येथील ग्रामस्थांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल केलेल्या सर्व अर्जाच्या जागांवर ग्रामस्थांच्या एकमताने दिपक जाधव, प्रफुल्ल वीर, सागर हाके, शैलेश कोल्हटकर, रत्नमाला धोकटे, जयश्री शिंदे, सुमन धोकटे, बेबीताई कुंभार, अर्चना मदने, वैशाली गोतपागर व तम्मना मुजावर यांची बिनविरोध निवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला.बिनविरोध झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ यांनी नामदार बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी नामदार बाळासाहेब पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.यावेळी सहयाद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास पवार, गोपाळराव धोकटे, बाबुराव धोकटे, चंद्रकांत मदने, महेश सुतार, अधिक सुर्वे, दिगंबर डांगे, मनोज डांगे  व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment